there is no blood storage in blood banks in nagpur  
नागपूर

रुग्णांसाठी रक्ताची जुळवाजुळव करणार कशी? अवघे दोन दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक  

केवल जीवनतारे

नागपूर : मध्य भारतातील गरिबांच्या आजारांवर वरदान ठरलेल्या मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आगामी २ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रक्ताची जुळवाजुळव करताना नातेवाइकांची दमछाक होत आहे.

कोरोनाचा कहर कमी झाला असला, तरी अपघातामध्ये जमखींसह इतर बायपास सर्जरी, किडनी तसेच इतर आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज भासते. अशा वेळी डॉक्टर रक्तासाठी नातेवाइकांवर दबाव आणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पर्वावर मेडिकल, मेयो, सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत सुमारे दोनशेवर रक्तपिशव्या गोळा झाल्या. यामुळे आगामी तीन ते चार दिवस तुटवडा भासणार नाही. मात्र, मेडिकल, सुपरमध्ये दर दिवसाला ३० ते ३५ रक्तपिशव्यांची गरज पडते. .

शहरातील सरकारीसह खासगीत सुमारे दीडशेवर रक्तपिशव्यांची गरज आहे. हा तुटवडा भरून काढणे रक्तपेढ्यांना आव्हान ठरत आहे. सरकारी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याने खासगी रक्तपेढ्यांतून रक्त विकत आणावे लागत असल्याची व्यथा रुग्णाच्या नातेवाइकांनी बोलून दाखवली.

प्लाझ्मा आहे

तीन दिवसांपूर्वी मेयोत २१२ तर मेडिकलमध्ये ९४ पिशव्या रक्त उपलब्ध होते. प्लेटलेट्स तसेच संपूर्ण रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असलेल्या रक्तातून वेगळा केलेला ‘प्लाझ्मा’ १०३ युनिट आहे. प्लेटलेट्सच्या २२, पीआरसी गटातील ३६ पिशव्या रक्त उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आज ऑनलाइन कार्यशाळा

थॅलेसेमिया व सिकलसेल रुग्णांना आजार, रक्तसंचयन, उपचार आणि उपलब्ध सुविधा यांची माहिती व्हावी, या उद्देशाने सिकलसेल जागृती सप्ताहानिमित्त थॅलेसेमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडियाच्या वतीने शुक्रवारी ११ डिसेंबरला ऑनलाइन कार्यशाळा घेतली जाणार आहे. 

सकाळी साडेअकरा वाजता उद्घाटनानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या रक्तगट राष्ट्रीय समन्वयक विनीता श्रीवास्तव केंद्राच्या योजनांविषयी माहिती देतील. राष्ट्रीय थॅलेसेमिया वेलफेअर सोसायटीचे सचिव डॉ. जे. एस. अरोरा, रक्तसंक्रमणतज्ज्ञ डॉ. रवी, बालरोगतज्ज्ञ डॉ. विंकी रुघवानी, मेडिकलच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन आनुवंशिक आजारांवर विचार व्यक्त करतील.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT