Tiger sighting in Kodegaon Shivara in Nagpur district 
नागपूर

नागपूर जिल्ह्यातील कोदेगाव शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

किशोर गणवीर

खापा (जि. नागपूर) : कोदेगाव शिवारात शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या मजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ दिसल्याने शेतकरी व शेतमजूर मजूर धास्तावले असून वनविभागाचे कर्मचारी वाघाचा शोध घेत आहेत. 

कोदेगाव गावाजवळीत शेतात सकाळी कापूस वेचणीकरिता मजूर गेले असता दुपारी बाराच्या दरम्यान शेताजवळील नाल्याकाठावर वन्यप्राण्याची चाहूल लागली. शेतात कापूस वेचत असणाऱ्या चंद्रकलाबाई राऊत या चाहूल कशाची आहे, म्हणून पाहायला गेल्या. त्यांना नाल्याकाठावर पट्टेदार वाघ दिसून आला. वाघाला बघून त्यांची बोलतीच बंद झाली. त्या घाबरून बेशुद्ध पडल्या. त्यांच्या जवळच असलेल्या अनुसयाबाई राऊत यांनी आरडाओरडा केली.

गावकरी गोळा झाले. दरम्यान, वाघ पळून गेला. त्वरित याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. वाघाचा शोध घेतला, पण त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. वनविभागाच्या पथकाने फटाके फोडले. कदाचित वाघ पुढे निघून गेला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागात कापूस वेचणी तसेच शेतीच्या अन्य कामाकरिता शेतमजूर शेतात कामावर जाण्याची आता भीती व्यक्त करीत आहेत. गावकरी व वनकर्मचाऱ्यांनी वाघाचा शोधा सुरू केला. 

गेल्या आठवड्याभऱ्यापासून आजनी शिवारात याच वाघाने धुमाकूळ घातला होता. गेल्या दोन दिवसाआधी एका म्हशीच्या पिलाची वाघाने शिकार केल्याची माहिती आहे. आजनी शिवारातूनच सोमवारी कोदेगाव शिवारात या वाघाने प्रवेश केला. वनविभागाचे कर्मचारी या वाघाच्या हालचालीवर रात्रंदिन लक्ष ठेवून आहेत. 

नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, शेतात एकटे जाऊ नये, चार पाच जणांच्या गटाने जावे, वाघ कुठे आढळून आला किंवा त्याबाबत काही माहिती मिळाली असता तात्काळ वनविभागास कळवावे, गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन खापा वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एन.नाईक यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT