Tukaram Mundhe's CEO post is out of order
Tukaram Mundhe's CEO post is out of order 
नागपूर

महापौर जोशी म्हणतात, तुकाराम मुंढे यांचे सीईओपद नियमबाह्य असल्याचे सिद्ध

सकाळवृत्तसेवा

नागपूर : नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या (एनएसएससीडीसीएल) संचालक मंडळाची बैठक 10 तारखेला आहे. विषय पत्रिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सीईओपद नियमबाह्य बळकावल्याचे सिद्ध झाले, असे महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी नमुद केले. नियमाने चालणारे आयुक्त मुंढे यांनी नियमांची पायमल्ली केल्याच्या महापौरांच्या आरोपामुळे स्मार्ट सिटीची बैठक वादळी ठरण्याची शक्‍यता आहे.

एनएसएससीडीसीएलच्या संचालक मंडळाची 10 जुलैला बैठक होणार आहे. कंपनी सचिवांनी या बैठकीसाठी विषय पत्रिका तयार केली आहे. या विषय पत्रिकेतील सहाव्या क्रमांकावर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सीईओपदी नियुक्तीचा प्रस्ताव आहे. यावर महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषद घेऊन नियमबाह्य कामे केल्याप्रकरणी आयुक्तांवर तोफ डागली. स्मार्ट सिटीच्या एजेंड्यावरून आयुक्ताचे सीईओपद नियमबाह्य असून, त्यांनी 18 कोटींचे देयके एका कंपनीला कुठल्या अधिकारात दिले, असा सवाल महापौरांनी उपस्थित केला.

कामाची बिले देण्याबाबत यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता, असे आयुक्त म्हणतात. मागील संचालक मंडळाच्या बैठकीत ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती. त्यांना कसे काय काढले? असेही महापौर म्हणाले. संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यासाठी तसेच विषय पत्रिकेवर स्वतःच्या नियुक्तीच्या विषयाला प्राधान्यक्रम दिला. परंतु एनएसएससीडीसीएलचे चेअरमन प्रवीण परदेसी यांनी नियमाप्रमाणे विषय पत्रिकेतील विषयाचा क्रम लावल्याचे जोशी म्हणाले.

संचालक मंडळाच्या बैठकीत घेणार हरकत

आयुक्तांची सीईओपदी नियुक्ती नियमाने व्हावी, यात गैर नाही. परंतु, आयुक्तांनी अधिकार नसतानाही कंपन्यांची बिले काढणे, अधिकाऱ्यांना काढले, याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत जाब विचारला जाईल, असेही संदीप जोशी यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT