turnover of crores will school trip trend towards waterpark jungle tourism nagpur sakal
नागपूर

Tourism : शालेय सहलीमुळे होणार कोट्यवधीची उलाढाल

पर्यटनस्थळे गजबजली; वॉटरपार्क, जंगल पर्यटनाकडे कल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सलग दोन वर्षे कोरोनामुळे शालेय सहलींना ब्रेक लागला होता. आता मात्र पुन्हा शालेय सहलीचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांसह वॉटर पार्क पुन्हा गजबजू लागले आहेत. या सहलीसाठी वॉटर पार्कला अधिक पसंती मिळू लागल्याने ते हाऊस फुल्ल असल्याची माहिती पुढे आलेली आहे. सहलीच्या दोन महिन्याच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयाच्या उलाढालीची शक्यता आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने सहली नेताना खबरदारी आणि नियमांचे पालन शाळांनी करावे असे आवाहनही केलेले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दोन वर्ष शाळांच्या सहली बंद पडल्या होत्या, आता त्या पुन्हा सुरू झाल्याने पर्यटनस्थळांवरील विक्रेते, हॉटेल चालक, वॉटर पार्कचे संचालक यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. दररोज वॉटर पार्कमध्ये ५०० ते हजारच्या जवळपास शालेय विद्यार्थी भेट देत आहेत.

नागपूर शहराच्या आजूबाजूला अंदाजे आठ ते नऊ वॉटर पार्क आहेत. याशिवाय दहा ते १२ पर्यटनस्थळेही आहे. त्यात दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, रामटेक, स्वामी नारायण मंदिर, वेकोलिचे गार्डन, पारशिवनी जवळील कुँवारा भीमसेन, खिंडसी तलाव, गोरेवाडा प्राणिसंग्रहालय, पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, पवनार, रामाडॅम, सेवाग्राम आदी पर्यटन स्थळांचा समावेश आहे. या ठिकाणी शालेय सहली वाढलेल्या आहेत. परिणामी, स्थानिकांना रोजगार मिळू लागला आहे.

काळजी घ्या

समुद्रकिनारे, अतिजोखमीची पर्वतांवरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी, उंच टेकड्या, वॉटर पार्क आदी ठिकाणी शैक्षणिक सहली काढताना विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना गड-किल्ले दाखवण्यात यावेत असेही म्हटले आहे. सहलीपूर्वी दोन प्रशिक्षित शिक्षकांनी सहलीबाबत, तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचावासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे. सहलीबरोबर प्रथमोपचार पेटी वा ज्या ठिकाणी सहल जाणार तेथील शासकीय रुग्णालये आणि डॉक्टरांचे संपर्क क्रमांक बरोबर असावेत.

संमतीपत्र बंधनकारक

सहलीपूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक केले आहे. सहलीच्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणानुसार घ्यावयाची काळजी, याचे मार्गदर्शन शाळांनी विद्यार्थ्यांना केले पाहिजे. सहलींसाठी फक्त एसटी बसमधूनच सहल घेऊन जाणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना एकटे वा नजरेआड फिरण्यास सोडू नये. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी संध्याकाळी परत घरी येतील, अशा बेतानेच आखाव्यात. सहलीत विद्यार्थिनींचा सहभाग असेल, तर एक महिला शिक्षिका आणि एक महिला पालक प्रतिनिधीबरोबर नेणे बंधनकारक राहील. विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबर कोणतेही गैरवर्तन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर शालेय सहली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे दोन वर्षापासून शांत असलेले पर्यटनस्थळांवर आता गर्दी दिसू लागली आहे. शाळांना सहली आयोजित करीत असताना सुरक्षितता आणि गुणवत्तेचा विचार करून वॉटर पार्क अथवा इतर स्थळांची निवड करावी. काळजी घेणे गरजेचे आहे.

- चंद्रपाल चौकसे, पर्यटन मित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

Jogendra Kawade : फलटण प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारांचा पण तपास करा

World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT