nagpur sakal
नागपूर

Nagpur : जी-२० ची दोन दिवसीय बैठक नागपुरात

विभागीय आयुक्त : शहराची प्रभावी प्रतिमानिर्मिती करणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशात पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या जी-२० या राष्ट्रसमूहांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात नागपूरचाही सहभाग राहणार आहे. जी-२० ची दोन दिवसीय बैठक २१ व २२ मार्चला होणार आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते.

आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबतच्या पूर्वतयारीचे नियोजन करण्यात आले. या परिषदेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर उपराजधानीची आकर्षक पध्दतीने प्रतिमानिर्मिती (ब्रॅंडींग) करण्यासाठी विविध प्रशासकीय यंत्रणांना विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, महामेट्रोचे सरव्यवस्थापक संदीप बापट, उपायुक्त आशा पठाण, माहिती संचालक हेमराज बागूल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर आदींसह विविध यंत्रणाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

जी-२० ची दोन दिवसीय बैठक नागपुरात

जी-२० राष्ट्रसमुहाची वार्षिक परिषद पुढील वर्षी भारतात होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशभरातील प्रमुख शहरांत विविध गटांच्या बैठका होणार आहेत. त्यात मुंबई, पुण्यासह नागपूर येथेही बैठक नियोजित आहे. त्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी शहरात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून २१ आणि २२ मार्च रोजी ही बैठक होणार आहे.

महापालिका, मेट्रो, नागपूर सुधार प्रन्यास, विमानतळ प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा विविध संस्था त्यासाठी नियोजन करीत आहेत. नागपूर महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या प्राथमिक नियोजनाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. विभागीय आयुक्तांनी याबाबत सर्व प्रशासकीय विभागांनी काटेकोर नियोजनासह तत्परतेने कार्यवाहीच्या सूचना केल्या.

संशोधन आणि नावीन्यपूर्ण गटाची बैठक होणार

संशोधन आणि नाविन्यपूर्णता गटाचे प्रतिनिधी प्रामुख्याने नागपूर शहरात येणार आहेत. त्यानिमित्ताने शहरातील विविध प्रमुख महत्वाच्या स्थळांचे सौदर्यीकरण करण्यात येणार आहे. तसेच विविध उपक्रमांचेही आयोजन होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूर शहराची चांगल्या पद्धतीने दखल घेतली जावी आणि त्याचा शहराच्या प्रतिमानिर्मितीसाठी लाभ व्हावा या उद्देशाने शहरात कार्यरत असणाऱ्या विविध प्रशासकीय यंत्रणा कसोशीने प्रयत्न करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT