Swine Flu
Swine Flu Sakal
नागपूर

Swine Flu : स्वाइन फ्लूने डोकं काढले वर; शहरात दोन मृत्यू उघड

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाचा प्रकोप थांबला असताना स्वाइन फ्लूने डोकं वर काढले आहे. उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’चे दोन मृत्यू झाल्याचे झाले उघड.

नागपूर - कोरोनाचा प्रकोप थांबला असताना स्वाइन फ्लूने डोकं वर काढले आहे. उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’चे दोन मृत्यू झाल्याचे उघड झाले असून मंगळवारी (ता.९) महापालिकेच्या मृत्यू विश्लेषण समितीच्या (डेथ ऑडिट कमिटी) बैठकीत यावर शिक्कामोर्तब ले. हे दोन्ही मृत्यू हे शहरातील आहे. ही मनपाच्या आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी बाब आहे.

मनपाच्या आरोग्य विभागात मंगळवारच्या बैठकीत ‘स्वाईन फ्लू’ने दगावलेल्या दोन्ही रुग्णांची सुक्ष्म माहिती घेण्यात आली. त्यांचे केसपेपर सादर करण्यात आले. यात ६० वर्षे वयोगटातील य रुग्णांना ‘स्वाईन फ्लू’ सोबत इतर सहव्याधी होत्या. दोन्ही मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ने झाल्याचे शिक्कामोर्तब केले गेले. यात एक महिला आणि एक पुरुष होता.

१ जानेवारी २०२३ पासून नागपुरात स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीच्या तीन बैठका झाल्या. यात आतापर्यंत ४ स्वाईन फ्लूबाधितांचे मृत्यू झाल्याचे निदान मृत्यू विश्लेषनातून पुढे आले. त्यात तिघांच्या मृत्यूला स्वाईन फ्लू कारणीभूत असल्याचे समितीने प्रमाणित केले. तर एक मृत्यू इतर सहव्याधीने झाला.

आतापर्यंत १९ बाधित

१ जानेवारी २०२३ पासून शहरात इन्फल्युएंझा एच १ एन १ या आजाराचे एकूण १९ रुग्ण आढळले. त्यापैकी ४ रुग्ण नागपूर शहराबाहेरील होते. जानेवारी २०२३ मध्ये ८ रुग्ण, फेब्रुवारी २ रुग्ण, मार्च मध्ये ३, एप्रिल ४ व मे महिन्यात २ रुग्ण आढळले. या रुग्णांच्या घरी व परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाने संपर्कातील व्यक्तीचा शोध घेतला. परिसरात फ्लू सदृश रुग्णांचे सर्व्हेक्षण केले.

मंगळवारी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, मेयोच्या सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे डॉ. रविंद्र खडसे, डॉ. निलीमा वानखेडे, डॉ. शीतल मोहने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT