nitin-gadkari
nitin-gadkari  
नागपूर

लॉकडाऊनमध्ये खाण्याचा भरपूर आनंद घेतोय... चित्रपट बघतोय

सकाळवृत्तसेवा

नागपूर : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मी नागपुरात आहे आणि घरात आहे. माझी सर्व कामे घरूनच सुरू आहेत. घरात अनेक पदार्थ बनविले जात आहेत. मी खवय्या असल्यामुळे माझा खाण्याची चंगळ आहे. या काळात निरनिराळ्या पदार्थांचा आस्वाद घेत आहे. कधी कधी किचनमध्ये जाऊन पदार्थ बनविण्याचा प्रयत्न करतो. तसेच कुटुंबीयांसोबत चित्रपट पाहण्याचा आनंद देखील घेतोय असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

संपूर्ण जगावर ओढवलेले हे कोरोनाचे संकट फार मोठे आहे. या संकटातून आपण निश्‍चितपणे बाहेर पडू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण कोराना हरविण्यात यशस्वी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनच्या काळात संवाद साधण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा फायदा होतो आहे, याचा आनंद आहे. केवळ राजकारण्यांनीच नव्हे तर प्रत्येकांने कोरोनापासून स्वतःता बचाव केला पाहिजे. कोरोनाला घाबरून चालणार नाही. संकटात मात करण्यासाठी आम्ही तयार आहोत. या वैश्विक संकटाला संयमाने आणि धैर्याने सामोरे जायला हवे असेही ते म्हणाले.  

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गडकरी म्हणाले की, स्थलांतरित मजुरांनी आपल्या गावाला जायला हरकत नाही. ज्यांना गावाला जायचे आहे अशांसाठी सोय केली आहे. पण, घाबरून जावू नका. जे मंजूर गावाला गेले आहेत त्यांनी परत यावे म्हणून मी आणि महाराष्ट्र सरकारनेही तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. अनेक मजुरांचे कुटुंब महाराष्ट्रात आहे. त्यांनी परत यायला हवे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेसचे एक नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार भेटायला आले होते. त्यांनीही मजुरांचा हाच मुद्दा माझ्याकडे मांडला आहे. त्यांनाही मीच तेच सांगितले, असे गडकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT