नागपूर

Washim APMC: प्रशासक काळातील कारभार चौकशीच्या रडारवर! रिसोड बाजार समितीतील अनियमितता अहवालातून उघड, कारवाईचे निर्देश

सकाळ डिजिटल टीम

APMC Risod Fraud News : येथील बाजार समितीत प्रशासक कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे चौकशी अहवालातून निदर्शनास आले आहे. विशेष लेखापरीक्षक वर्ग २ ( फिरते पथक ) सहकारी संस्था अकोला यांच्या चौकशी अहवालातून सदर माहिती पुढे आली आहे.

याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशीम यांना दिले आहेत.
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती अलिकडच्या काळात या-ना त्या कारणाने चर्चेचा विषय ठरत आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्यातील मतभेद अनेक वेळा चव्हाट्यावर आले आहेत. अशातच तालुक्यातील रिठद येथील विठ्ठल आरू यांनी प्रशासक कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार दि. ८ जून २३ रोजी प्रशासनातील वरिष्ठांकडे केली होती.

सदर प्रकरण चौकशीसाठी आर. एम. जोशी विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था अकोला यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. मोप येथील रामेश्वर नरवाडे यांनी देखील उपरोक्त विषयाबाबत तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने विशेष लेखा परीक्षक यांनी सदर तक्रारीची पडताळणी करून चौकशी अहवाल सादर केला आहे. त्याचे अवलोकन केले असता, भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसते.(Latest Marathi News)

त्यामध्ये प्रामुख्याने अनेक बाबींचे खर्च निविदा न मागवता करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बहुतांश बाबी अधिकार क्षेत्राबाहेरील असूनही मंजूर केल्या असल्याचा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, प्रशासक हे शासकीय अधिकारी असल्याने त्यांच्याकडून नियम, कायदा, आणि परिपत्रकीय सूचनांचे उल्लंघन होणे अपेक्षित नसते. परंतू ते झाले असल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे.

त्यामुळे चौकशी अधिकारी यांच्या चौकशी अहवालातील निष्कर्ष आपण पडताळून आवश्यक कारवाई करावी व केलेल्या कारवाईची प्रत तक्रारदारास देऊन विभागीय सहनिबंधक कार्यालय अमरावती यांना अवगत करावे, असे निर्देश विभागीय सहनिबंधक विनायक काहाळकर यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशीम यांना दिले आहेत.

भ्रष्टाचार उघड होण्याच्या चर्चेला उधाण
संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत येथील बाजार समितीवर प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली होती. नियमानुसार सदर प्रशासक मंडळास कुठलेही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो.

प्रशासक मंडळ हे केवळ निवडणूक होईपर्यंत समितीचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी नेमले जात असते. मात्र येथील प्रशासक आणि तत्कालीन सचिवांनी अनेक नियमबाह्य धोरणात्मक निर्णय घेतले असल्याचे तक्रारदार यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली होती.

त्या अनुषंगाने सदर प्रकरण चौकशी अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांना प्राप्त झाला आहे. सदर चौकशीत अनेक मुद्दे भ्रष्टाचार झाल्याचे अधोरेखित करणारे आहेत. त्यामुळे बाजार समितीत आजतागायत मोठ्याप्रमाणात झालेले भ्रष्टाचार आता उघड होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. (Latest Marathi News)

आजी-माजीचे धाबे दणाणले
बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे अनेक आजी-माजी सभापती, उपसभापती, काही संचालक यांचे सुद्धा धाबे दणाणले असल्याची चर्चा बाजार समितीच्या गोटात चांगलीच रंगली आहे. मात्र अस्वस्थ व गोंधळलेल्या कारभारात शेतकऱ्यांची परवड आजही कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT