Women should focus on vaccination Schedule released by FOGSI Dr Jaydeep Tank info Sakal
नागपूर

Women Vaccination : अंगावर दुखणे न काढता महिलांनी लसीकरणावर द्यावा भर; FOGSIने केले वेळापत्रक जारी- डॉ. जयदीप टांक

कुटुंब, घर सांभाळत नोकरी करणाऱ्या महिलांचे स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे अक्षम्‍य दुर्लक्ष होत असल्‍याचे निदर्शनास आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : आरोग्‍याच्‍या समस्‍या भेडसावत असल्‍या तरी अनेक महिला अंगावर दुखणे काढतात. यातून पुढे अनेकदा गंभीर आजाराला निमंत्रण मिळते. त्यामुळे महिलांनी दुखणे अंगावर न काढता तज्‍ज्ञाचा सल्‍ला घेणे गरजेचे आहे.

आजच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पेलत नोकरी, व्‍यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रत्‍येक महिलेने आपल्‍याही आरोग्‍याची निगा राखावी, हेच निमित्त साधून फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (एफओजीएसआय) ने अलीकडेच महिलांसाठी लसीकरण वेळापत्रक जारी केले. प्रौढ महिलांसाठी आवश्यक लसीची विस्तृत यादी दिली आहे, ती प्रत्येक लस केव्हा घ्यावी याचीही शिफारस केली आहे.

कुटुंब, घर सांभाळत नोकरी करणाऱ्या महिलांचे स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे अक्षम्‍य दुर्लक्ष होत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. आरोग्याच्‍या समस्‍या भेडसावत असल्‍या तरी अंगावर दुखणे काढत एखादी गोळी घेऊन आपल्‍या दैनंदिन जबाबदारीलाच प्राधान्‍य देणाऱ्या महिलांचा आकडा लक्षणीय आहे.

एका अहवालात पुरुषांच्या तुलनेत महिला २५ टक्के अधिक वेळ खराब आरोग्यासाठी घालवतात. यामुळे लसीकरण हे बदलण्यात मदत करू शकते. लस-प्रतिबंधित रोगांपासून स्त्रियांचे रक्षण करू शकते, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात योगदान देईल, असे फॉग्सीचे अध्यक्ष डॉ. जयदीप टांक म्हणाले.

गर्भवती होण्यापूर्वी लसीकरण

  • एमएमआर

  • चिकनपॉक्स

  • व्हॅरिसेला

  • ९ ते २६ वर्षे वयोगटातील महिलांसाठी बायव्हॅलेंट, क्वाड्रिव्हॅलेंट आणि ९-व्हॅलेंट लसीची शिफारस केली जाते.

या लसींची शिफारस

  • टिटॅनस ः पहिल्या तिमाहीनंतर सर्व गर्भवती महिलांना धनुर्वात टाळण्यासाठी गर्भधारणेदरम्यान टीटीच्या २ डोसची शिफारस केली जाते.

  • टीडॅपलस ः डिप्थीरिया, टिटॅनस आणि डांग्या खोकल्याविरूद्ध आई आणि बाळ दोघांसाठी तिमाहीत गर्भवती महिलांसाठी आवश्यक.

  • इन्फ्लूएंझा ः इन्फ्लूएंझा हंगामात (ऑक्टोबर - मार्च) सर्वांसाठी नियमित इन्फ्लूएंझा लसीकरणाची शिफारस

सिकलसेल, थॅलेसेमियाबाधितांसाठी

  • सिकलसेल किंवा स्प्लेनेक्टोमी बाधित महिलांना दर ५ वर्षांनी न्यूमोकोकल लस घ्यावी,

  • एच इन्फ्लूएंझा आणि मेनिंगोकोकल लस एकच डोस शिफारस केली जाते.

गर्भाशय मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी

एचपीव्ही लस - ही गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी १२ वर्षानंतर व वयाच्या १५ वर्षांपूर्वी ६ महिन्यांच्या अंतराने दोन डोस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT