one side love
one side love 
विदर्भ

वकील तरुणीवर एकतर्फी प्रेम नायब तहसीलदाराला भोवले 

सकाळ वृत्तसेवा

अहेरी : वकील असलेल्या एका युवतीने प्रेमास नकार दिल्याने तिला अश्‍लील तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अहेरी येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार दिनकर खोत यांच्यावर अहेरी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 16) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तक्रारदार तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार ती चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करते. एप्रिल 2018 मध्ये ती अहेरीच्या उपविभागीय कार्यालयात कामानिमित्त गेली असता तेथे तिची नायब तहसीलदार दिनकर खोत यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर खोत यांनी युवतीशी मोबाईलवर संपर्क साधून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, सदर तरुणीने संशय आल्याने खोत यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील मूळ गावी चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांचा विवाह झाला असल्याचे व दोन मुले असल्याची, तसेच त्यांचे अन्य महिलांशीही संबंध असल्याची माहिती मिळाली. यानंतर युवतीने खोत यांच्याशी संपर्क तोडले होते. 
परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून खोत हे नवीन क्रमांकावरून युवतीला वारंवार त्रास देत होते. तो क्रमांकही तरुणीने ब्लॉक केला. तरीही, ते चंद्रपूरला येऊन युवतीला त्रास देत राहिले, असे नमूद करून युवतीने तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी (ता. 15) नायब तहसीलदार खोत व त्यांच्या पत्नीने मोबाईलवरून फोन करून तक्रारकर्त्या युवतीला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सदर युवती खोत यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेली असता खोत व त्यांच्या पत्नीने युवतीला जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केली. त्यामुळे युवतीने अहेरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी नायब तहसीलदार खोत व त्यांच्या पत्नीवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update: संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT