नांदुरा : वळण रस्ता गेला दुसऱ्यांदा वाहून
नांदुरा : वळण रस्ता गेला दुसऱ्यांदा वाहून sakal
विदर्भ

नांदुरा : वळण रस्ता गेला दुसऱ्यांदा वाहून

सकाळ वृत्तसेवा

नांदुरा : तालुक्यातील शेंबा येथे विश्वगंगा नदीवर पावसाळ्या अगोदरपासून जवळपास साडेपाच कोटी रुपये खर्चून पूलाचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम सुरु होताच कंत्राटदाराच्‍या वतीने पुलाच्या खालच्या बाजूने वळणरस्ता बनविण्यात आला असता त्याचे काम हे थातूरमातूर व शासकीय अंदाजपत्रकाचा आधार न घेता झाल्यामुळे हा वळणरस्ता पावसाळ्यातील पहिल्याच पुरात वाहून गेला होता. परंतु, त्‍यानंतरही वेळ मारुन नेण्यासाठी सदर वळणरस्ता हा दर्जाहीन बनवल्‍याने (ता.२५) आलेल्या दुसऱ्या पुरामुळेे रस्‍ता दुसऱ्यांदा वाहून गेला आहे. यामुळे १२ तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

तालुक्यातील शेंबा बु येथील बाजारपेठ बघता जवळपासचे २० ते २५ गावे या गावाला व्‍यवहाराकरीता जुळलेली आहेत. त्‍यामुळे दिवसभर या रस्‍त्‍यावर वर्दळ असते. तसेच याआधी आलेल्‍या पुरामुळे वळणरस्‍ता वाहून गेल्‍याने कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे या गावाचा दुसऱ्यांदा संपर्क तुटून अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेंबा बु.येथील विश्वगंगा नदीचे उगमस्थान हे बुलडाणा जिल्ह्यातील तारापूर येथील पलढगचे धरणातून असून, हे धरण इंग्रजकालीन बांधकाम केलेले आहे, गेल्या दोन वर्षांपासून हे धरण धोक्याची पातळी ओलांडत असून, स्थानिक जिल्हा प्रशासन वेळोवेळी धरण पाण्याने भरल्यानंतर धोक्याचा इशारा देत नजीकच्या गावांना सावधानतेचा इशारा देते. सोबतच सदर मार्ग हा सातपुड्याच्या डोंगरातून निघून शेंबा बु या मार्गाने बुलडाणा जिल्ह्याच्या अजिंठा पर्वतरांगेत जोडण्यासाठी सर्व वाहनधारकांना सोयीचा मार्ग म्हणून ओळखल्या जातो , परंतु सदर कंत्राटदार याने या गोष्टींचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता अत्यंत थातूरमातूर पद्धतीने वळणमार्ग बनवून एक एक,दोन-दोन दिवस हा मार्ग बंद करण्याचा घाट तर रचला नाही ना असा प्रश्न स्थानिकामधून उपस्थित होत असून, सदरच्या कंत्राटदारावर कुणाचा वरदहस्त आहे.

ज्याच्या जोरावर स्थानिक बांधकाम विभाग सोबत सर्व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का बसत आहे अशी चर्चा या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांमधून होत आहे.

वळणमार्गासाठी प्रशासकीय मान्यतेनुसार १५ लाख ६६ हजार ११६ रुपयांची तरतूद असून, पुलाच्या कामासाठी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी शासनाने जवळपास १८ लक्ष रुपये आकस्मिक खर्च म्हणून दिला असताना सुद्धा सदर कंत्राटदार अशा पद्धतीचे निकृष्ट दर्जाचे काम करत असेल तर सदर नवीन पुलाच्या सर्व कामाची सुद्धा तपासणी करण्याची गरज आहे. अशी दबक्या आवाजात जनतेतून चर्चा होत आहे.

शेंबा येथील विश्वगंगा नदीवर गेल्या दोन तीन महिन्यापासून पूलाचे बांधकाम सुरू आहे. येथे पुलाच्या खालच्या बाजूने वळणमार्ग काढण्यात आला असून, अगोदर पहिल्या पुरात वाहून गेलेला वळणरस्ता दुसऱ्यांदा तयार करुन देखील वाहून गेला आहे. सदर वळण रस्‍त्‍याची उंची कमी घेतल्‍यामुळे हा रस्ता वाहून गेला आहे.त्यामुळे नेहमीची वाहतूक कोंडी होत आहे.यासाठी संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

- नंदकिशोर खोदले,सरपंच शेंबा बु.

रविवार दि.२६ रोजी बुलडाणा येथील आठवडी बाजारातून चिल्लर विक्रीसाठी आणल्या जाणारा भाजीपाला नदीवरील मोऱ्या वाहून गेल्याने जाणे शक्य झाले नाही. त्‍यामुळे नुकसान झाले आहे.

-संदीप पाटील,भाजीपाला व्यावसायिक,शेंबा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT