Akola
Akola 
विदर्भ

'नर्मदा वानखडे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा'

सकाळवृत्तसेवा

अकोला : जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व डफरीन जिल्हा सामान्य रुग्णालय या रुग्णालयामधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळ नर्मदा नरेश वानखडे या रुग्ण महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर ज्ञा. कलाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली अाहे.

यासंदर्भात प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अाणि अामदार बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून त्यांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात अाणून दिले अाहे. १० सप्टेंबर रोजी या महिलेला डफरीन रुग्णालय अमरावती येथे प्रसुतीकरीता भरती करण्यात अाले होते. या महिलेचे एक सिजरची शस्त्रक्रिया झाली असूनसुद्धा त्यांनी दुसरे पण सिजर अाॅपरेशन केले. या कुटूंब नियोजनाच्या चुकीच्या अाॅपरेशनमुळे ही महिला दगावली. त्यानंतर प्रसुती महिलेची परिस्थिती बिघडल्यामुळे तीन दिवसांनी डफरीन रुग्णालयातील डाॅक्टरानी व बाळाला इर्विन येथे पाठविण्यात अाले.  

त्यानंतर १३ ते १९ सप्टेंबरपर्यंत या महिलेचा उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असताना १९ सप्टेंबर रोजी ती महिला दगावली. ही घटना डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे झाली असल्याचा अारोप निवेदनातून करण्यात अाला अाहे. तरी या प्रकाराकडे लक्ष देऊन चौकशी करण्यात यावी अाणि गुन्हेगारांवर कठाेर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात अाली अाहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT