वंदना चव्हाण
वंदना चव्हाण  
विदर्भ

राष्ट्रवादी अर्बन सेल तपासणार शहर विकासाची नाडी : खासदार वंदना चव्हाण

सकाळवृत्तसेवा

अमरावती : राज्यातील विविध महापालिका क्षेत्रांतर्गत नागरिकांना आवश्‍यक असलेल्या मूलभूत सुविधा आजवर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. हा मुद्दा कायम दुर्लक्षित राहत असल्याने आता राष्ट्रवादी अर्बन सेलच्या माध्यमातून शहरी भागातील नागरी समस्यांवर "फोकस' करण्यात येणार आहे. त्यासाठी निवेदने, मोर्चा, आंदोलनाचे शस्त्र उगारले जाणार आहे, अशी माहिती अर्बन सेलच्या अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी आज येथे दिली.
यावेळी उपाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण, प्रदेश सचिव सुरेश पाटील उपस्थित होते.
वंदना चव्हाण म्हणाल्या की, राज्यातील विविध महापालिका क्षेत्रांमध्ये अनेक विकासात्मक प्रयोग होत आहेत. त्याच धर्तीवर आपल्या क्षेत्रातील महापालिकांमध्ये प्रयोग करता येईल का, याची चाचपणी सेलच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी शहरस्तरावर 25 पदाधिकाऱ्यांची टीम गठित केली जाणार आहे. अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये आजही मूलभूत सुविधांची वानवा आहे. त्या पूर्ण करण्यासाठी सेलच्या माध्यमातून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करतील. महिलांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृह, आरोग्याच्या सोयीसुविधा, सार्वजनिक प्रसाधनगृहांमधील अस्वच्छता, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या यांसह 26 मुद्द्यांवर अर्बन सेल काम करणार आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी किंवा एखादा नवीन प्रयोग शहरात राबविण्यासाठी प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन तसेच गरज पडल्यास आंदोलनाच्या माध्यमातून सेलचे काम सुरू राहणार असल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव तथा जि.प.च्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, प्रदेश महासचिव सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत महल्ले, सुचित्रा वनवे, अविनाश मार्डीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT