ncp
ncp 
विदर्भ

राष्ट्रवादी काँग्रेस महानगर कार्यकारिणीत लवकरच फेरबदल

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पुढील दोन वर्ष महत्त्वाची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर कार्यकारिणीची फेररचना करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी पक्ष निरीक्षक प्रवीण कुंटे यांच्या उपस्थितीत नुकतीच आढावा बैठक पार पडली. या बैठकीचा तपशील व महानगर कार्यकारिणी फेरबदलाबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मागविला असल्याची माहिती आहे.


अकोला शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी सक्षम नेतृत्व निर्माण करण्यासोबतच बुथ कमिटीपासून सर्वच स्तरावर आढावा घेतला जात आहे. विशेषतः येत्या काळात ज्या ठिकाणी निवडणुका आहेत, त्या ठिकाणी कार्यकारिणीचे पुनर्गंठण करण्याच्या दृष्टीने प्रदेश स्तरावरून आढावा घेतला जात आहे.

अकोला महानगरपालिकेची निवडणूक दोन वर्षांवर आहे. त्यादृष्टीने शहरात पक्ष संघटन बळकटीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. बुथकमिटी, कमिटी प्रमुख आदींसह पक्ष संघटनेसाठी आवश्‍यक उपाययोजना झाल्यात काय? याचा आढावा घेण्यासाठी पक्ष निरीक्षक प्रवीण कुंटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महानगरची बैठक गत आठवड्यात घेण्यात आली. या बैठकीमध्ये सांगोपान चर्चा झाली असून, कार्यकारिणीच्या कामकाजाबाबत अनेकांनी बैठकीत नाराजीचा सूर आवळला. त्यावरून वादळी चर्चाही झाल्याची माहिती आहे.


बैठकीचे चित्रिकरण प्रदेशाध्यक्षांकडे जाणार
या बैठकीचे चित्रिकरण करण्यात आल्याची माहिती आहे. हे चित्रिकरण थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यावरून प्रदेशाध्यक्ष पुढील निर्णय घेणार आहेत. सोबतच पक्ष निरीक्षकांना या बैठकीचा संपूर्ण अहवाल मागविल्याचीही माहिती आहे.


महानगराध्यक्ष, कार्याध्यक्षांच्या नावावर चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष बदल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अध्यक्षांसोबतच कार्याध्यक्षही नियुक्त केला जाण्याची चर्चा आहे. त्यासाठी पक्षातील काही नेत्यांच्या नावावर आढावा बैठकीत चर्चा झाली असून, प्रदेशाध्यक्षांकडे ही नावे सूचविण्याची विनंती कार्यकर्त्यांनी पक्षनिरीक्षकांना केल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT