naxalite stick posters after gadchiroli naxal attack site
naxalite stick posters after gadchiroli naxal attack site 
विदर्भ

नक्षलवाद्यांचे भ्याड हल्ल्यानंतर धमकीचे बॅनर

सकाळवृत्तसेवा

गडचिरोली: नक्षलवाद्यांनी जांभुरखेडा गावाजवळ महाराष्ट्र दिनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर आज (गुरुवार) सरकारला धमकीचे बॅनर झळकावले आहेत. गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका, असे बॅनर उत्तर गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांकडून लावण्यात आले आहे. उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीद्वारे अशाप्रकारचे बॅनर अनेक गावांमध्ये लावण्यात आले आहेत.

नक्षलवाद्यांनी बुधवारी (ता. 1) भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 15 जवान हुतात्मा झाले. या भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी दुसऱया दिवशी बॅनरबाजी करत सरकारला धमकी दिली आहे. बॅनर्सद्वारे एप्रिल 2018 मध्ये कसनसूर येथे झालेल्या 40 नक्षलींच्या एन्काऊंटरचा निषेध नोंदवला आहे. 27 एप्रिल 2019 रोजी डिव्हीसी कॉम्रेड रामको नरोटी हिचा देखील पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. या घटनेचाही निषेध करण्यात आला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची आज पाहणी केली.

दरम्यान, नक्षलवाद्यांनी मंगळवारी (ता. 30) मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या 36 वाहनांची जाळपोळ केली होती. नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने जवानांचे पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे 15 जवान हुतात्मा झाले. या हुतात्मा जवानांमध्ये गडचिरोलीमधील सहा, भंडारा जिल्ह्यातील तीन, बुलडाणा जिल्ह्यातील दोन व हिंगोली, बीड, नागपूर, यवतमाळ येथील प्रत्येकी एका जवानाचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT