भामरागड : मुख्य रस्त्यावर झाड तोडून लावले बंदचे बॅनर.
भामरागड : मुख्य रस्त्यावर झाड तोडून लावले बंदचे बॅनर.  
विदर्भ

नक्षल्यांनी केली गावपाटलासह दोघांची हत्या 

सकाळ वृत्तसेवा

एटापल्ली (गडचिरोली) : जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या पीपल्स गुर्रिल्ला आर्मीच्या सोमवार (ता.2) पासून सुरू झालेल्या स्थापना सप्ताहाला हिंसक वळण लागले आहे. नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्‍यातील पुरसलगोंदी येथील दोन ग्रामस्थांची रविवारी रात्री हत्या केली आणि त्यांचे मृतदेह रस्त्यावर फेकून दिले. मासू देबला पुंगाटी(60 वर्षे) व ऋषी लालू मेश्राम (57 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. मासू पुंगाटी हे गावपाटील, तर ऋषी मेश्राम हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. दरम्यान, अहेरी तालुक्‍यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये हत्ती तसेच अन्य प्राण्यांचा छळ केला जात असून तो थांबविण्यात यावा, अशी मागणी करून नक्षलवाद्यांनी तेथील सौंदर्यींकरणाची नासधूस केली. 

गोळ्या घालून  केली हत्या

रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास 80 ते 90 संख्येतील सशस्त्र नक्षलवादी पुरसलगोंदी गावात गेले. त्यांनी मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम यांना घराबाहेर बोलावून गावाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाइकांनी त्यांना माफ करण्याची विनंती केली आणि नेण्यास विरोध केला. मात्र, नक्षलवाद्यांनी जबरदस्तीने दोघांना गावाबाहेर नेले आणि त्यांची गोळ्या घालून हत्या केली. सोमवारी सकाळी पुरसलगोंदी-आलेंगा रस्त्यावर ग्रामस्थांना दोघांचेही मृतदेह आढळून आले. 
पुरसलगोंदीनजीकच्या सुरजागड पहाडावर लॉयड मेटल्स ऍण्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीने लोहखनिज उत्खननाचे काम सुरू आहे. मध्यंतरी हे काम बंद होते. परंतु, आता पुन्हा काम सुरू झाले आहे. नक्षल्यांचा विरोध असतानाही कंपनीने उत्खननाचे काम सुरू केले. मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम यांनी उत्खननास समर्थन दिले होते. त्यामुळे त्यांची हत्या केल्याचे नक्षल्यांनी मृतदेहाजवळ ठेवलेल्या पत्रकात नमुद केले आहे. 

पर्यटकही भयभीत

अहेरी तालुक्‍यातील कमलापूर येथे हत्ती कॅम्प आहे. या ठिकाणी वनविभागाने अनेक हत्ती आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. नक्षल्यांनी तेथे नासधूस केली आहे. याप्रकारामुळे पर्यटकही भयभीत झाले आहेत. तसेच आलापल्ली-भामरागड मार्गावरील तलवाडा गावाजवळ झाडे आडवी टाकून नक्षल्यांनी रस्ता अडविला होता. नक्षल्यांच्या कारवायांमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी 27 नोव्हेंबरच्या रात्री कोरची तालुक्‍यातील भिमनखोजी येथील मनोज दयाराम हिडको या 17 वर्षीय युवकाची गोळ्या घालून हत्या केली होती. तसेच अहेरी तालुक्‍यातील पेरमिली गावाजवळ झाडे आडवी टाकून व बॅनर बांधून रस्ता अडविला होता. त्यानंतर 30 नोव्हेंबरच्या सकाळी भामरागड तालुक्‍यातील लाहेरी पलीकडील अबुझमाड जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षल्यांना कंठस्नान घातले होते, यामुळे नक्षली आणखीनच खवळले आहेत. दरम्यान, पोलिसांनी रेड अलर्ट जारी केला असून, सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

आज हुंकार रॅली 

नक्षलवाद्यांकडून निरपराध आदिवासींची हत्या करण्यात आल्याने या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मंगळवारी (ता.3 ) गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात सकाळी हुंकार रॅली आयोजित केली आहे. रॅलीचा समारोप जिल्हा प्रेक्षागार मैदानावर केला जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाने केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT