file photo 
विदर्भ

सामुदायिक प्रार्थनेची गरज 

सकाळ वृत्तसेवा

गुरुकुंज मोझरी(अमरावती) ः आजच्या काळात समाजामध्ये माणुसकी हरविलेली आहे. समाज आतून दुभंगलेल्या अवस्थेत असून एकप्रकारचे बंदिस्त जीवन जगत आहे. परंतु, सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून समाजातील माणसातील माणुसकी जागविल्या जाऊ शकते, असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र वैद्य यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवातील सामुदायिक प्रार्थनेवर ते बोलत होते. 
राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी सर्वधर्माचे अवलोकन करून विविध धर्मांच्या प्रार्थना पद्धती पाहून आपली सामुदायिक प्रार्थना निर्माण केली. या प्रार्थनेकरिता कोणत्याही मंदिराची गरज नसून मोकळ्या मैदानात नैसर्गिक वातावरणात सामुदायिक प्रार्थना घेतल्या जाते. प्रार्थना नुसती केल्याने होणार नाही तर व्यवहारातसुद्धा प्रार्थनेचे आचरण करावे लागेल, असेही ते म्हणाले. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थनेत विश्‍वबंधुत्वाची भावना असून संपूर्ण मानवतेच्या कल्याणाची साधना सांगितली आहे. त्यामुळे प्रत्येक गावात सामुदायिक प्रार्थना होणे आजच्या काळाची गरज आहे, असे प्रा. वैद्य म्हणाले. 

आजचे कार्यक्रम 
राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात मंगळवारी (ता. 15) सकाळी 11 वाजता आंतरमहाविद्यालयीन वक्‍तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुण्यतिथी महोत्सवातील आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे 5.30 वाजता सामुदायिक ध्यानाने होईल. या वेळी ध्यानाच्या महत्त्वावर सुश्री ज्ञानेश्‍वरीदीदी मार्गदर्शन करतील. सकाळी 7 ते 8 या वेळात योगासन व प्राणायामचा कार्यक्रम होईल. ग्रामगीता प्रचन सकाळी 8 ते 9 वाजता हरिचंद्र देशमुख करतील. त्यानंतर 11 ते 5 या वेळात आंतरमहाविद्यालयीन वक्‍तृत्व स्पर्धा होईल. सामुदायिक प्रार्थना सायंकाळी 6 वाजता घेण्यात येईल. या वेळी अरुण सालोडकर सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर चिंतन प्रस्तुत करतील. रात्री 9.15 ते 10.30 पंढरीनाथ ठाकरे कीर्तन सादर करतील.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT