रुग्णालयात भरती बालिका.
रुग्णालयात भरती बालिका. 
विदर्भ

रेल्वेबोगीत आढळली चार दिवसांची मुलगी

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : दिवस मंगळवार... वेळ दुपारी 12.30 ची... बल्लारशहा-गोंदिया रेल्वेगाडी गोंदिया स्थानकात थांबली...प्रवासी भराभर उतरले...सफाई कामगार सफाईकरिता बोगीत चढला... त्याच्या कानी बाळाच्या रडण्याचा आवाज पडला... त्याने आवाज ऐकू येत असलेल्या बोगीकडे लगेच धाव घेतली... तर काय, तीन-चार दिवसांची नवजात मुलगी त्याला दिसली...त्याने चौकशी विभागाला कळविले... रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले... सध्या ही मुलगी येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारशहा येथून प्रवासी घेऊन निघालेली बल्लारशहा-गोंदिया रेल्वेगाडी दुपारी 12.30 च्या सुमारास गोंदिया येथील फलाट क्रमांक एकवर आली. तशी प्रत्येक बोगी प्रवाशांच्या गर्दीने भरलेली होती. प्रत्येकजण गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करीत होते. सर्व प्रवासी रेल्वेतून उतरले. त्यानंतर सफाई कर्मचारी विक्की महावत सफाई करण्याकरिता रेल्वेगाडीत चढला. सफाईचे काम करीत असताना त्याला एका बोगीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्या दिशेने त्याने धाव घेतली. या वेळी त्याला नवजात मुलगी दिसली. त्याने रेल्वेच्या चौकशी विभागाला माहिती दिली. रेल्वे पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे यांनी ताबडतोब महिला शिपायासोबत बोगी गाठली. बालिकेला ताब्यात घेऊन उपचारासाठी येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात भरती केले. सध्या ही बालिका अतिदक्षता विभागात आहे. ही मुलगी नेमकी कोणाची, कोणी टाकून पळ काढला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांचा शोध रेल्वे पोलिस घेत आहेत. अनैतिक संबंधातून किंवा ज्यांना मुलगी नको अशा माता-पित्याने मुलीला बोगीत सोडून पळ काढला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT