Curfew
Curfew Curfew
विदर्भ

अमरावतीनंतर अकोल्यात रात्रीची संचारबंदी तर चंद्रपुरात जमावबंदी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उलटल्यानंतर काही समाजकंटकांनी तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीतील घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील अकोट येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता अकोला शहरातही बुधवारी दुपारी १२ वाजतापासून जमावबंदी आदेश लागू केला आहे. सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी नीलेश अपार यांनी बुधवारी काढले.

अकोला शहरातील काही भागात तणाव निर्माण करण्याचा घटना व अफवा पसरविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी अकोला यांनी बुधवारी तातडीने जिल्हा प्रशासनाकडे संचारबंदी लागू करण्याची शिफार केली होती. त्यानुसार अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय उपविभागीय दंडाधिकारी यांनी घेतला.

बुधवारी दुपारी १२ वाजतापासून ते शुक्रवारी (ता. १९) सकाळी ६ वाजेपर्यंत अकोला शहरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू केला आहे. जमावबंदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी चार किंवा चारपेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावास प्रतिबंध केला आहे. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात नामनिदर्शेनपत्र दाखल करण्यासाठी मात्र सूट राहील. याशिवाय सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

आरोग्य, अत्यावश्यक सेवांना सूट

संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्य विषयक सेवा सुरू राहणार आहे. याशिवाय शासकीय कार्यालय अत्यावश्यक कामासाठी सुरू राहतील, असे उपविभागीय दंडाधिकारी नीलेश अपार यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे. याकालावधित आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिला आहे.

शहरातील दोन घटनांमुळे उचलले पाऊल

त्रिपुरातील घटनेनंतर अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारानंतर अकोला शहरात दोन दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण आहे. याच काळात तपे हनुमान परिसरात गाड्या फोडण्याची अफवा पसरली होती तर अकोट फैल पोलिस स्टेशनच्या हद्दीतही तणाव निर्माण करणारी घटना घडली होती. या दोन घटनांमुळे पोलिसांनी कठोर उपाययोजना करीत शहरात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे केली होती.

गस्ती वाहनांकडून सूचना

जमावबंदी व संचारबंदी आदेशाबाबत पोलिसांच्या गस्ती वाहनांमधून नागरिकांना सूचना देण्यात आल्यात. शहरातील पोलिस स्टेशनच्या हद्दीत व मुख्य बाजारपेठेत गस्ती वाहनातून गर्दी न करण्याचे व चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र न येण्याची व सायंकाळी सात वाजतापासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीबाबत सूचना देण्यात आली.

लोकप्रतिनिधी, पोलिसांचे शांतता राखण्याचे आवाहन

शहरातील तणावपूर्ण स्थिती बघता नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा व इतर लोकप्रतिनिधींनी केले आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात जमावबंदी

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश १६ नोव्हेंबर रात्री १२ वाजतापासून तर ३० नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, जमा करून ठेवता येणार नाहीत किंवा जवळ बाळगता येणार नाही किंवा तयार करता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT