नितीन गडकरी
नितीन गडकरी  
विदर्भ

गडकरी यांना नगरविकास खाते?

सकाळवृत्तसेवा

नागपूर : नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता त्यांना कुठले खाते दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांना शपथ देण्यात आल्याने गडकरींचे प्रमोशन होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दिल्लीत पार पडला. यात गडकरी आणि अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचा समावेश आहे. मात्र, संपूर्ण सोहळ्यात गडकरी यांच्याच खात्याविषयी सर्वत्र चर्चा आहे. अरुण जेटली, व्यंकय्या नायडू आणि सुषमा स्वराज यांचा यंदाच्या मंत्रिमंडळात समावेश नाही. त्यामुळे मोदी, राजनाथसिंग, अमित शहा यांच्यानंतर गडकरी यांना शपथ देण्यात आली. या क्रमांकानुसार खाते वाटप झाल्यास गडकरी यांचा पहिल्या पाचमध्ये समावेश होऊ शकतो असा तर्क व्यक्त केल्या जात आहे.
पहिल्या पाचमध्ये गृह, परराष्ट्र, अर्थ, संरक्षण आणि नगरविकास या खात्यांचा समावेश होतो. गडकरी यांचा अनुभव, भूपृष्ठ वाहतूक विभागातील कामाचा झपाटा बघता त्यांना नगरविकास खाते मिळण्याची दाट शक्‍यता आहे. मागील मंत्रिमंडळात नगरविकास खाते व्यंकय्या नायडू यांच्याकडे होते. उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचा कार्यभार नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
गडकरी दिल्लीतही लोकप्रिय
मागील मंत्रिमंडळात गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी आणि गंगा शुद्धीकरण ही तीन प्रमुख खाती होती. या तीनही खात्याची कामगिरी तुलनेत सर्वोत्कृष्ट ठरली. सोनिया गांधी, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही लोकसभेत बाके वाजवून त्यांची प्रशंसा केली होती. मोदी यांच्यानंतर भावी पंतप्रधान म्हणूनही गडकरी यांच्या नावाची चर्चा देशभर होती. मोदी, अमित शहा यांच्यानंतर देशात गडकरी यांच्याच नावाचा सर्वाधिक उल्लेख केला जातो. मंत्री म्हणूनसुद्धा गडकरी हेच दिल्लीत सर्वाधिक लोकप्रिय आहेत. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचे समजले जाणारे नगरविकास खाते त्यांच्याकडे सोपविले जाणार असल्याचे कळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT