Nitin Gadkari says this is just a trailer of Modi Government
Nitin Gadkari says this is just a trailer of Modi Government 
विदर्भ

तुम्ही फक्त ट्रेलर पाहिलाय.. पिक्‍चर अभी बाकी है! : गडकरी 

सकाळवृत्तसेवा

लोकसभा 2019 : भंडारा : 'तुम्ही आतापर्यंत जे काही पाहिलं, तो फक्त ट्रेलर होता.. पिक्‍चर अभी बाकी है..' अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) विरोधकांना इशाराच दिला. विदर्भामध्ये गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन झाले. 

नागपूर-भंडारा हा सहा पदरी रस्ता तयार केला जाणार आहे आणि एक हजार कोटी रुपयांचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू होईल, अशी घोषणा गडकरी यांनी यावेळी केली. गडकरी म्हणाले, "सर्वाधिक आत्महत्या झालेल्या जिल्ह्यात एकूण 108 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यासाठीच्या एकूण निधीपैकी 25 टक्के रक्कम केंद्र सरकार आणि 75 टक्के रक्कम नाबार्ड देणार आहे. यासाठी एकूण 20 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.'' 

'भाजपमध्ये कुठलीही घराणेशाही नाही' असे सांगत गडकरी यांनी कॉंग्रेसला टोला लगावला. 'आमदार किंवा खासदाराने मागितले, म्हणून त्यांच्या मुलांना तिकीट मिळणार नाही. कार्यकर्त्यांकडून, जनतेकडून ही मागणी झाली पाहिजे', असे गडकरी म्हणाले. 

'सत्तेत आल्यापासून आम्ही जनतेसाठी कामे केली आहेत. विदर्भाचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा चेहराच बदलण्याचे काम आम्ही केले आहे. याचे श्रेय भाजपला नाही, जनतेला आहे. आतापर्यंत तुम्ही जे पाहिले, तो फक्त ट्रेलर होता.. पिक्‍चर अभी बाकी है', असा सूचक इशाराही त्यांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT