Railway
Railway 
विदर्भ

वृद्ध महिलेला आरपीएफ जवानाने दिले जीवनदान

सकाळवृत्तसेवा

नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्तव्यदक्ष जवानाने गुरुवारी एका वयोवृद्ध प्रवासी महिलेला जीवदान मिळाले. धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात त्या खाली पडल्या. रेल्वेखाली येणार तोच आरपीएफ जवान शेषराव पाटील यांनी छडप घालून त्यांना आपल्याकडे खेचून घेतले. नागपूर रेल्वेस्थानकावर सायंकाळी घडलेला हा संपूर्ण थरारक घटनाक्रम सीसीटीव्ही  कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सुशीला अग्रवाल (७३) रा. श्रीनाथ सोसायटी, गोरक्षण रोड, अकोला असे सुखरूप बचावलेल्या महिलेचे नाव आहे. त्या आपल्या लहान बहिणीसोबत अकोल्याला जाण्यासाठी निघाल्या. दोघीही नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या. गोंदिया - मुंबई विदर्भ एक्‍स्प्रेस येताच दोन्ही बहिणी बी -२ कोचमध्ये जाऊन बसल्या. तिकीट कनफर्म नसल्याने बहीण टीटीईच्या शोधात गेली तर सुशीला  या गाडीतच बसून होत्या. ५.१५ वाजता गाडी सुरू झाली. तोवर बहीणही परतली नसल्याने सुशीला घाबरल्या. चालत्या गाडीतूनच फलाटावर उडी घेतली. नेमके फलाट आणि गाडीतील  अंतर अधिक असलेल्या ठिकाणीच त्या पडल्या. हे दृश्‍य बघून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. जवळच शेषराव पाटील उपस्थित होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सुशीला यांच्या दिशेने झडप घातली. त्यांचा हात धरून आपल्याकडे ओढून घेतले. त्यांच्या धाडसी प्रयत्नामुळे सुशीला यांचे प्राण वाचले. घटनेमुळे त्या बऱ्याच घाबरल्या. पाटील यांनी त्यांना फलाटावर  बसवून पाणी पाजले. त्यानंतर त्यांची विचारपूस केली. सुशील यांनी देवदूत ठरलेल्या पाटील यांचे आभार मानत यापुढे कधीही चालत्या गाडून चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT