One hundred satellites to launch in one day 
विदर्भ

अभिमानास्पद! एकाच दिवशी झेपावणार शंभर उपग्रह; इंडिया रेकॉर्ड, आशिया रेकॉर्डसह वर्ल्ड रेकॉर्ड होणार प्रस्थापित

श्रीनाथ वानखडे

मांजरखेड (जि. अमरावती) : सूर्य, चंद्र, तारे, ग्रह व उपग्रहांचा अभ्यास म्हणजे खरं तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचा विषय. पण, विद्यार्थ्यांचे हेच स्वप्न सत्यात उतरणार आहे. डॉ. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरमद्वारा राज्यातील एक हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शंभर उपग्रहांची निर्मिती करून वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. रामेश्वरातील या अभिनव प्रयोगामुळे सात फेब्रुवारी २०२१ रोजी एकाच दिवशी इंडिया रेकॉर्ड, आशिया रेकॉर्डसह वल्र्ड रेकॉर्ड प्रस्थापित होणार आहे.

राज्यातील एक हजार विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये तीन गटातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. पहिला गट इयत्ता ५ ते ८, दुसरा इयत्ता ९ ते १२ तर तिसरा डिप्लोमा, बी.एस सी, इंजिनिअरिंगचा आहे. विद्यार्थ्यांना स्पेस टेक्नॉलॉजी, उपग्रह तसेच पर्यावरणाचा अभ्यास व्हावा हा यामागील उद्देश आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्त्रोतील तज्ज्ञ व्यक्तीद्वारा २ ते ७ जानेवारी ऑनलाईन प्रशिक्षित केले जाणार आहे. यानंतर मुलांनी मिळविलेल्या ज्ञानाचे प्रात्यक्षिक नागपूर, पुणे व मुंबई येथे करवून घेतले जाणार आहे.

या मिशनअंतर्गत शंभर उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात झेपावणार आहे. त्यामुळे स्पेस रिसर्च पेलोड क्युब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय?, त्याचे विविध भाग कुठले?, त्यांचे कार्य कसे चालते?, हेलियम बलून म्हणजे काय?, या प्रकारचे उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवतात?, या उपग्रहात कुठले सेन्सर असतात?, कुठले सॉफ्टवेअर कसे काम करते? याची सर्व माहिती शालेय विद्यार्थ्यांना मराठीमधून दिली जाणार आहे. जगात सर्वांत कमी वजनाचे शंभर उपग्रह बनवून ३५ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर नेऊन तेथून प्रत्यक्ष वातावरणातील ओझोन स्तरापासून सर्वच स्तरावरील माहिती संकलित केली जाणार आहे.

विद्यार्थी ठरणार विश्वविक्रमी

शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन भविष्यातील यशस्वी वैज्ञानिक होण्यासाठी ही पायाभरणी आहे. एकाच ठिकाणाहून शंभप उपग्रह तेही एकाच ठिकाणाहून हा खरंतर वेगळाच विश्वविक्रम आहे. केवळ २४ तासात हे उपग्रह परत येऊन समुद्रात उतरविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उपग्रहाचा अभ्यास होणार आहे, शिवाय ते विश्वविक्रमाचे मानकरी ठरणार असल्याचे ज्ञान फउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा अब्दुल कलाम फउंडेशनचे समन्वयक युवा शास्त्रज्ञ अजिक्य कोत्तावार यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीही उतरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव

PMC Election : वाढलेल्या इच्छुकांमुळे नेत्यांचा लागणार कस; भाजपकडून उमेदवारीसाठी नेमके काय निकष लावले जाणार, याकडे अनेकांचे लक्ष

Success Story: गुराख्याच्या हाती पोलिसाची काठी! प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत भरतनं मिळवलं यश; कळपासोबत भटकंती करत केला अभ्यास..

Latest Marathi News Live Update : राजगुरुमध्ये क्लास सुरु असतानाच विद्यार्थाचा गळा चिरला

Year End 2025: स्क्रबपासून ते केसांच्या वाढीसाठी तेलापर्यंत, 'हे' 5 घरगुती उपाय ठरले उपयुक्त

SCROLL FOR NEXT