Sakal Exclusive
Sakal Exclusive 
विदर्भ

एक हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त

सकाळवृत्तसेवा

नागपूर - अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका शहरातील महाविद्यालयांना बसला आहे. शहरात अकरावीच्या १९ हजार ९३१ जागा रिक्त असल्याने जवळपास एक हजार शिक्षकांवर अतिरिक्त होण्याचे संकटाचे ठग गडद झाले आहे. 

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेशासाठी चार फेऱ्या झाल्या. त्या प्रक्रियेत ५४ हजार ८१० जागांसाठी ३६ हजार ६११ अर्ज आले होते. यानंतर १८ ते २१ ऑगस्टदरम्यान विशेष फेरी घेऊन प्रवेश देण्यात आले. यात ३२ हजार ४१२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेत. तसेच केंद्रीय प्रवेश समितीमार्फत २७ ऑगस्टपासून ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ फेरी राबवून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. यानंतर एटीकेटी आणि जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेतील निकालासाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीसाठी नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानुसार ३५ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविले. मात्र, अर्ज केलेल्या जवळपास १९ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाही. कनिष्ठ महाविद्यालयात ६० विद्यार्थ्यांच्या एका तुकडीमागे तीन शिक्षकांची नियुक्‍ती केली जाते. 

कनिष्ठ महाविद्यालयात १९ हजार ३२४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे जवळपास हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्‍न राज्यभर प्रलंबित असताना, अशावेळी अकरावीचे राज्यभरात वाढलेल्या रिक्त जागांची संख्या लक्षात घेता, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा समायोजनाचा प्रश्‍न भविष्यात बिकट रूप धारण करणार असल्याचे चित्र आहे. 

समायोजनाचा प्रश्‍न ठरणार डोकेदुखी 
गतवर्षी कनिष्ठ महाविद्यालयात ३२ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी २१ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. ७ शिक्षक रुजू झाले नाही तर इतर शिक्षकांचे प्रकरण प्रलंबित आहेत. असे असताना, रिक्त जागांमुळे एक हजार शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांच्या समायोजनाचा प्रश्‍न अधिक बिकट होणार असून शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढणार आहे.

शहरातील अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेशाचा धसका विद्यार्थ्यांनी घेतला. त्यातून प्रवेश घटले आहे. येत्या काळात रिक्त जागांमुळे तुकडीनिहाय तीन शिक्षक अतिरिक्त होणार असून शहरातील हजार तर राज्यातील पाच जिल्ह्यांत आकडा आठ हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. 
- प्रा. दिलीप तडस, राज्य संयुक्त कार्यवाह, शिक्षक भारती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT