tiger
tiger sakal
विदर्भ

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, एक गंभीर

सकाळ डिजिटल टीम

कारंजा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या नागझरी कंपार्टमेंट या संरक्षित परिसरात तेंदुपत्ता संकलनाकरिता गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला.

कारंजा (घाडगे), खरांगणा, (जि. वर्धा) - कारंजा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या नागझरी कंपार्टमेंट या संरक्षित परिसरात तेंदुपत्ता संकलनाकरिता गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली. सुशीला भाऊराव मंडारी (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे, तर अविता रवींद्र मंडारी (वय २७) असे जखमी महिलेचे नाव आहे. या दोन्ही महिला येनी दोडका येथील रहिवाशी आहेत.

सुशीला मंडारी आणि अविता मंडारी या दोघींसह १२ जणांची टोळी तेंदूपत्ता संकलन करण्याकरिता सकाळी नागझरी कंपार्टमेंटच्या संरक्षित वनातील हनुमान मंदिराजवळ गेल्या होत्या. तेंदूपत्ता जमा करत असताना या जंगलामध्ये असलेल्या वाघाने दोन्ही महिलांवर हल्ला केला. त्यामध्ये सुशीला जागीच ठार झाली. तर तिच्या सोबत असलेली अविता गंभीर जखमी झाली. जखमी अवितावर कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये औषधोपचार केल्यानंतर नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रवाना करण्यात आले आहे.

वाघाने महिलांवर हल्ला केल्याची माहिती परिसरातील तेंदूपत्ता संकलन करीत असलेल्या आकाश भलावी या युवकाला कळताच त्याने ही माहिती गावामध्ये व वन विभागाचे कर्मचारी पुरुषोत्तम कळसाईत यांना दिली. त्यांनी घटनास्थळावर येनीदोडका येथील गावकरी व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गायनेर, पुरुषोत्तम कळसाईत, सी. टी. रंगारी, ए. जी. काळे, क्षेत्रसहाय्यक पाटील, कान्हा दहातोंडे, कुमारी काजी, गाढवे जाधव, पी.एम. ढाले, ए. आर. अखंडे, ये. एस. तांदन, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक हे घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेच्या मुलाला पाच लाखांचा धनादेश दिला. जखमी महिलेला शासन निर्णयाप्रमाणे १० हजार रुपयांची मदत देण्यात आल्याचे सांगितले. घटनास्थळावर पोलिस विभागाचे पी. डी. मोहन धुळे, नीलेश मुंडे, प्रवीण चोरे, उमेश खामनकर, कोमल वानखडे यांनी घटनास्थळावर जाऊन घटनेची चौकशी केली.

तेदूपत्ता संकलनाचा होता शेवटचा दिवस

या परिसरात तेंदुपत्ता संकलनाला ५ मे पासून प्रारंभ करण्यात आला होता. त्याचा २६ मे हा शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी ही घटना घडली.

वाघाच्या वास्तव्याने शेतकरी हैराण

चार दिवसापूर्वी लिंगा येथील शेतकरी महादेव चौधरी यांच्या शेतामध्ये बांधून असलेल्या कुत्र्यावर वाघाने हल्ला केला होता. परंतु, त्या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला. सध्या शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी शेतामध्ये सतत काम करत आहेत. त्यामध्ये वाघाची दहशत परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली असून मान्सून पूर्व मशागत कशी करावी या विवंचनेने मध्ये शेतकरी सापडलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT