policeman tried to commit suicide by shooting a himself
policeman tried to commit suicide by shooting a himself 
विदर्भ

पोलीस शिपायाचा स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

सकाळवृत्तसेवा

कोरची (जि. गडचिरोली) : कोरची पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पतिराम दर्रो या पोलीस शिपायाने आज सकाळी 7 च्या दरम्यान स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पोलीस स्टेशनमध्ये घडली.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी गोरखनाथ दहिफळे यांनी दर्रो यांना गंभीर अवस्थेत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करून 108 रुग्णवाहिकेने नागपूरला हलविण्यात आले.
कोरची येथील दवाखान्यात 108 गाडी उपलब्ध नसल्यामुळे 40 किमी अंतरावरील कुरखेडा येथून गाडी बोलवण्यात आली. ही गाडी कोरचीला 9.30 ला पोहोचली. या गाडीतील डॉक्टर चौधरी हे गाडीसोबत न येता, त्यांनी रूग्णासह गाडी कुरखेडाला बोलाविली. या गाडीत डॉक्टर नसल्यामुळे नुसत्या ड्रायव्हर च्या भरवशावर गंभीर रूग्णाला कसे पाठवायचे? असा प्रश्न असतानाच उपस्थित पत्रकार व पोलीस अधिकारी यांनी चर्चा करून कोरची येथील दवाखान्यात उपस्थित डॉक्टर कावडकर यांना सोबत घेऊन रुग्णाला नागपूरला पाठविण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT