छायाचित्र
छायाचित्र 
विदर्भ

दहा हजारांवर पोस्टर, बॅनर काढले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने पोस्टर, बॅनर काढण्याची कारवाई सुरू केली असून, 10 हजारांवर पोस्टर, बॅनर काढण्यात आले.
विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी, 20 तारखेपासून आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय तसेच खासगी कार्यालय, सार्वजनिक ठिकाण, घरांवरील राजकीय व्यक्तींचे पोस्टर, बॅनर काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे. गेल्या 72 तासांत प्रशासनाने 10 हजारांवर पोस्टर, बॅनर काढले. शासकीय इमारतीवरील 1923, सार्वजनिक इमारतीवरील 4976 तर खासगी इमारतींवरून तीन हजारांवर पोस्टर, बॅनर काढण्यात आले. नागपूर शहरात 528 तर ग्रामीण भागातील 2726 पोस्टर, बॅनर काढण्यात आले. हिंगणा मतदारसंघात सर्वाधिक 1400 वर पोस्टर, बॅनर काढण्यात आले. सर्वांत कमी सात नागपूर दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातून काढण्यात आले.
वाडीच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा
आचारसंहिता सुरू असतानाही वाडी नगर परिषद क्षेत्रात राजकीय पक्षांचे बॅनर व पोस्टर काढण्यात आलेले नसल्याने हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून त्याची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्‍यक असते. त्यानुसार 72 तासांच्या आत राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर, विकासकामांच्या उद्‌घाटनांचे फलक आदी काढणे आवश्‍यक असते. त्यासंदर्भात निर्देशसुद्धा दिले आहेत. असे असतानाही वाडी परिसरातील राजकीय पक्षांचे पोस्टर व बॅनर काढण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली. सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेत वाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

"गुन्हे दाखल करा'
आचारसंहिताभंगाची कारवाई करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय पथकही तयार केले आहेत. 72 तासांनंतर पोस्टर, बॅनर कायम असल्यास संबंधित प्राधिकरणाच्या प्रमुखांना कारणे दाखवा बजावण्यासोबत आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT