pregnant woman delivery was denied because she do not have Aadhaar card yavatmal sakal
विदर्भ

गर्भवतीजवळ आधार कार्ड नसल्याने प्रसूतीला दिला नकार

सामाजिक संघटना माणुसकी जपते आणि आपल्या आरोग्य यंत्रणेचा स्तर किती खालावला याचा प्रत्यय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना येतो

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : वेदनेने विव्हळत असलेल्या गर्भवती महिलेच्या प्रसूतीला आधार कार्ड नसल्याने नकार दिला जातो. ती माउली तडफडत असताना सामाजिक संघटना माणुसकी जपते आणि आपल्या आरोग्य यंत्रणेचा स्तर किती खालावला याचा प्रत्यय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना येतो. हा दाहक प्रकार नुकताच मारेगाव येथे घडला. मारेगाव शहरातील एका चौकात भटक्या विमुक्त जमातीतील एक परिवार रस्त्यावर बसून लोखंडी वस्तू तयार करण्याचा व्यवसाय करतो. त्यांच्या परिवारातील महिला नऊ महिन्यांची गर्भवती होती.

कळा येत असल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी नेण्यात आले. त्या माउलीजवळ आधार कार्ड नसल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चक्क प्रसूती करण्यास नकार दिला. वेदनेने विव्हळत असलेली ती घरी परतली. आता काय करावे, असा यक्षप्रश्न त्या परिवारासमोर उभा ठाकला. खासगी रुग्णालयात न्यावे तर पैशाची चणचण. भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर नव्हता. ही बाब जनहित कल्याण संघटना व क्रांती युवा संघटना यांना कळली आणि त्या माउलीला मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जनहित कल्याण व क्रांती युवा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गर्भवती महिलेसह थेट वणी गाठली. कुठलाच विलंब न करता येथील लोढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. नवजात शिशूने गर्भातच शौच केल्याने अत्यंत नाजूक अवस्था होती. मात्र, डॉ. महेंद्र लोढा यांनी ती परिस्थिती हाताळत शस्त्रक्रिया केली. सध्या बाळ व माता सुखरूप आहेत. याप्रसंगी लागणारा संपूर्ण खर्च त्या दोन्ही सामाजिक संघटनांनी उचलला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT