file photo
file photo 
विदर्भ

खासगी जागेवरील झोपडपट्टीधारकांनाही पट्टे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महसूल, मनपा व नासुप्रच्या जागांवर झोपडपट्ट्या वसल्या आहेत. खासगी जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांसंदर्भात शासनस्तरावर धोरण ठरविण्यात येत आहे. संबंधित खासगी जागा मालकांना टीडीआर देऊन पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.
रामगिरी येथे नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे नोंदणीकृत पट्टे वितरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी पट्टे वाटपाची प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना दिले. झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्यासाठी महसूल, नागपूर सुधार प्रन्यास, तसेच मनपाला कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश देतानाच पात्र लाभार्थ्यांना मालकीहक्काचे नोंदणी झालेले पट्टे वाटप करण्याची कार्यवाही पूर्ण करा, असेही ते म्हणाले. मालकीहक्काचे पट्टे वाटपासंदर्भात शंभर झोपडपट्या महसूल विभागाच्या जागेवर आहे. त्यापैकी 52 झोपडपट्यांमधील नागरिकांची माहिती पूर्ण झाली. पट्टे वाटपासाठी शहराच्या विविध भागातून सुमारे 4 हजार 700 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 3 हजार 900 लाभार्थी पात्र ठरले. त्यांची यादी तयार केली आहे. महसूल विभागाच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करावी, तसेच त्यांना नोंदणी झालेले पट्टे वितरित करण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मनपाच्या जागेवर 13 झोपडपट्ट्या असून, त्यापैकी 13 झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. शासकीय जागा, मनपा व सुधार प्रन्यास आदी जागेवर बसलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही करताना महानगरपालिकेला जागेची मालकी देण्यात येईल. यासंदर्भात प्रस्ताव महापालिकेने सादर करावा, असेही निर्देशही त्यांनी दिले. मालकीहक्काचे पट्टे वाटपासंदर्भात ज्या पट्टेधारकांना पट्टे वाटपाची डिमांड मिळाली त्यांनी तत्काळी डिमांड भरून भूखंडाची मालकी आपल्या नावे करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मालकीहक्क पट्टे वाटपासंदर्भात मिळालेली डिमांड भरून भूखंडाची मालकी नावे करावी, असे आवाहन करण्यात आले. विकासनगर, मोठा इंदोरा, शिवनगर, चुन्नाभट्टी आदी वस्त्यांचे मालकीहक्काचे पट्टे वाटपाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देशही यावेळी दिले. बैठकीत आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह नगरसेवक संजय बंगाले, सेंटर फार सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेच्या प्रमुख लीना बुधे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT