file Photo
file Photo 
विदर्भ

शिवसेनेचे संभाव्य संचालक अस्वस्थ 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  राज्य सरकारने विविध महामंडळांवर संचालक नियुक्त केले. त्यांची नावेही घोषित केली. मात्र अधिकृत आदेशच काढण्यात येत नसल्याने सर्व संचालक अस्वस्थ आहेत. यात प्रामुख्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 
लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची संचालक मंडळावर नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यांची नावेही प्रसिद्ध करण्यात आली होती. खनिकर्म महामंडळावर आशीष जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे, सुनील शित्रे यांची नावे संचालक म्हणून नावे जाहीर केली होती. याचप्रमाणे नागपूर विभागातील म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळावर भाजप पदाधिकारी तारिक कुरैशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासोबत 13 संचालकांची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही. म्हाडावर शिवसेनेचे सतीश हरडे, चंद्रहास राऊत व रमेश वंजारी यांचीही नावे जाहीर केली होती. यापैकी एकालाही अद्याप अधिकृत नियुक्तीचे पत्र देण्यात आलेले नाही. 
लोकसभेत गाजर 
लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची नावे झळकली होती. त्यांच्या नावासमोर महामंडळ व पदेही लिहिली होती. अनेकांना ती व्हॉट्‌सऍपवर पाठविण्यात आली होती. आचारसंहिता असल्याने अनेकांना नियुक्ती निवडणूक आटोपल्यानंतर होईल, असे वाटले होते. प्रत्यक्षात आजवर नियुक्तीचे पत्र त्यांना मिळालेले नाही. त्यामुळे लोकसभेत गाजर दाखविल्याची चर्चा शिवसेनेत आहे. संचालकांची नावे शिवसेनेच्या वतीने पाठविण्यात आली होती. ती अधिकृत नसल्याचा दावाही केला जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT