Prostitution
Prostitution 
विदर्भ

पोटासाठी देह विकण्याचे कंत्राट!

केवल जीवनतारे

नागपूर - चेहऱ्याले रंग फासून पोटासाठी शरीर विकून जिंदगी झाली खराब. आता किती बी ठरवलं, तर परत नाय येऊ शकत. ही माझी काळोखी गुहा आहे. मरणानंतरच सुटका होईल. बापाच्या डोक्‍यावरचं कर्ज फेडण्यापासून तर पोटासाठी शरीराचे लचके तोडू देण्याचा कंत्राट घेतला आहे भाऊ... याच व्यवसायावर १२ जणांचं कुटुंब चालते. ही व्यथा येथील गंगा-जमना वस्तीमध्ये उद्‌ध्वस्त आयुष्य जगत असलेल्या सलोनी (बदललेले नाव) या महिलेची.

सलोनी मूळची ग्वाल्हेरची. आईवडिलांसह आजी-आजोबा, काका-काकी आणि भाऊ-बहीण अशा १२ जणांचं पोट याच व्यवसायावर. वडिलांवर कर्जाचा डोंगर. 

हे कर्ज चुकवण्यासाठी देहविक्रीचे कंत्राट घेऊन ती नागपुरात तीन वर्षांपूर्वी आली. येथे मिळेल ते खाणं आणि ग्राहकांसमोर आपल्या शरीराला झोकून देणं याशिवाय दुसरं आयुष्यात काहीच नव्हतं. तसा हा माझ्यासाठी खानदानी पेशा आहे, अशी सलोनी भावनेच्या भरात बोलून गेली. नागपूरच्या गंगा-जमनात एक खाट पडेल असा निवारा आहे. आधार कार्ड नाही. त्यामुळे पोलिसांची धाड पडल्यानंतर सुटण्यासाठी पैसे देण्याशिवाय पर्याय नसतो.

घरच्यांनीच तीन वर्षांचे कंत्राट दिल्याने या वेश्‍यावस्तीचे दुष्टचक्र भेदून बाहेर पडू शकत नाही. या घाण वातावरणापासून लांब जायचं आहे. ही माझीही इच्छा; परंतु पुढे जगायचं कसं? बी. ए. आहे. परंतु, हाताला काम मिळाले नसल्याने डोईवरचे कर्ज उतरवण्यासाठी हाच मार्ग दिसला. चमडी टाइट हैं तोवर ग्राहक मिळतात. परंतु, चाळिशी-पंचेचाळिशीनंतर पोट भरण्याएवढेही पैसे मिळत नसल्याचे चित्र येथे असल्याची सांगत होती. पंचेचाळिशीतील शरीर कोणी विकत घेत नाही. आता सुटले, ग्वाल्हेरमध्ये झालेला कंत्राट संपला आहे. उद्या सकाळीच निघणार आहे. येथून निघाल्यानंतर आता आयुष्य कोणीकडे घेऊन जाईल, हे येणारा काळच सांगेल. ‘हातों की लकिरों में क्‍या लिखा हैं... ये मुझे पता नहीं’ असे म्हणत एक खाट असलेल्या खोलीकडे वळली.

पाणावलेल्या डोळ्यांनी ती निघाली
दिवसभर माणसांना विकलेला देह रात्री शांत झोपू देत नाही. अशातच रात्री-अपरात्री पोलिसांचा धावा येतो. घरातून थेट पोलिस ठाण्यात रवानगी होते. पोलिसांच्या अत्याचाराने हात-पाय गळून पडतात. कोणताच देव धाऊन येत नाही. बिमार पडलं की, बिछान्यावर नुसतेच तळमळत पडून राहतो. या दुखण्यावर उपाय नाही. सलोनीच्या डोळ्यांत आसवं होती. परंतु, चेहऱ्यावर खोटे हसू आणून ती म्हणाली, ‘चले साहब ग्वालिअर...’ असे म्हणून निघून गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT