pulgaon bail pola farmer father and son drown in lake while washing bull wardha police Sakal
विदर्भ

Wardha News : बैलजोडी धुताना घडला अनर्थ; तलावात बुडून बापलेकाचा करुण अंत

हिवरा येथील पोळ्याच्या दिवशीची घटना

सकाळ वृत्तसेवा

पुलगाव/ विरुळ (आकाजी) : बैलजोडी धुण्याकरिता तलावावर गेलेल्या बापलेकाचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. हिवरा (हाडके) येथे ही घटना घडली. ऐन पोळा सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे गाव शोकात बुडाले आहे. राजू पुंडलिक राऊत (वय ५५), चंद्रकांत राजू राऊत (वय २७) अशी घटनेतील मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी बैलपोळा असल्याने शेतकरी राजू पुंडलिक राऊत मुलगा चंद्रकांतसह हिवरा शिवारातील शेताच्या काही अंतरावर असलेल्या तलावावर बैलजोडी धुण्याकरिता गेले. बैल धुण्याकरिता तलावाच्या पाण्यात उतरले. बैल धूत असताना एक बैल पाण्यात सरळ जात होता.

बैलाला तलावाच्या काठावर आणत असताना राजू खोलवर पाण्यात ओढल्या गेल्याने त्यांना वाचविण्याकरता मुलगा चंद्रकांत गेला. यात दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. ऐन पोळा सणाच्या दिवशी ही घटना घडल्याने हिवरा (हाडके) गावावर शोककळा पसरली आहे.

गाव झाले शोकमग्न

आपल्या सर्जा-राजाप्रति शेतकरीबांधवांनी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस बैलपोळा आहे. या सणाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात. बैलाच्या सजावटीसाठी मोठे परिश्रम घेतात. बैलजोडी सजविण्यापूर्वी हिवरा येथील बाप-लेक तलावावर गेले. मात्र, असे काही विपरित घडेल, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. तलावातील पाण्यात बुडून बापलेकाचा करुण अंत झाला आणि गाव शाोकमग्न झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT