aamravati
aamravati 
विदर्भ

अभियांत्रिकीच्या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरली प्रश्‍न

शशांक लावरे

अकाेला : अभियात्रिकीच्या माहिती तंत्रज्ञान शाखेच्या अाठव्या सत्र परीक्षेत 33 गुणांचा प्रश्‍न अभ्यासक्रमाबाहेरचा विचारला असल्याचे समाेर अाले अाहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अाता एमबीएच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अाम्हालाही न्याय द्यावा अशी मागणी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केली अाहे.

उन्हाळी 2018 च्या परीक्षेत माहिती तंत्रज्ञान शाखेच्या अाठव्या सत्र परीक्षेत ‘डाटा वेअरहाऊसींग अॅण्ड डेटा मायनींग’ या विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत 33 गुणांचा प्रश्‍न अभ्यासक्रमाबाहेरचा विचारण्यात अाला. हा एेच्छीक विषय केवळ शेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील 64 विद्यार्थ्यांनीच घेतला हाेता. परीक्षा केंद्रावरच विद्यार्थ्यांनी हा प्रश्‍न अभ्यासक्रमाबाहेरचा असल्याचे केंद्र प्रमुखांच्या लक्षात अाणून दिले हाेते.  

केंद्र प्रमुखांनी तुम्हाला जे येईल ते लिहा मात्र प्रश्‍न साेडवा असा सल्ला त्यावेळी विद्यार्थ्यांना दिला हाेता असे विद्यार्थ्यांचे म्हणणे अाहे. परीक्षेचा निकाल लागल्यावर मात्र याच विषयात अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत. काही विद्यार्थ्यांनी या विषयाच्या उत्तरपत्रिकेचे फेरमूल्यांकन करून घेतले असता त्याचे दाेन-चार गुण वाढुन अालेत. दरम्यान एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नपत्रिकेत झालेली प्रिटींग मिस्टेक विद्यापीठाने मान्य करून त्यांना त्या प्रश्नाचे सर्व 14 गुण देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रमाणेच अाम्हालाही 33 गुण द्यावेत, अशी मागणी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी केली अाहे. याबाबत 11 सप्टेंबरला विद्यापीठाला पत्रही दिले अाहे.

एमबीएच्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय
मॅनेजेरियल इकॉनॉमिक्स या एमबीएच्या प्रथम सत्राच्या विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत फायू या अाकड्याच्या जागी एस हे इंग्रजी अक्षर 14 गुणांच्या प्रश्नसाठी छापून अाले हाेते. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची तक्रार अामदार रवी राणा यांच्या युवास्वाभिमान पक्षाने केली हाेती. या तक्रारीची अतीशय गांभीर्याने दखल घेत कुलगुरूंनी परीक्षा व मुल्यांकन मंंडळाची स्पेशल बैठक बाेलविली. या बैठकीत विद्यापीठाकडून चूक झाल्याचे मान्य करून तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुर्ण 14 गुण देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात अाला.

हा विषय अद्याप मला माहिती नाही. माझ्यापर्यंत तक्रार अलेली नाही. जर अशी तक्रार अली तर पुढे काय करता येईल ते पाहू.
- डॉ. हेमंत देशमुख, परीक्षा नियंत्रक, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT