नागपूर - रॉयल लॉजमधील सेक्‍स रॅकेटमधील छाप्यात ताब्यात घेतलेल्या युवतींसह पोलिस.
नागपूर - रॉयल लॉजमधील सेक्‍स रॅकेटमधील छाप्यात ताब्यात घेतलेल्या युवतींसह पोलिस. 
विदर्भ

शहरातील दोन सेक्‍स रॅकेट्‌सवर छापे

सकाळवृत्तसेवा

नागपूर - शहरातील अजनी व यशोधरानगर परिसरात सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. या छाप्यात तीन तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. तर सात दलालांना अटक करण्यात आली. हे छापे गुन्हे शाखा व झोन पाचच्या पथकाने घातले. ‘सकाळ’ने चालविलेल्या ‘देहव्यापाची दलदल’ वृत्त मालिकेनंतर देहव्यापारावरील कारवाईला वेग आला आहे.

अजनी पोलिसांच्या आशीर्वादाने काशिनगर, रामेश्‍वरी रिंगरोडवर सेक्‍स रॅकेट सुरू होते. येथे आरोपी हर्षा ऊर्फ मनीषा रवींद्र पवार (२६, रा. पार्वतीनगर, हनुमान मंदिराजवळ) व विजयालक्ष्मी ऊर्फ भावना कनक (रा. विश्‍वकर्मानगर, शेळके यांच्या घरी किरायाने) या दोघी सेक्‍स रॅकेट चालवीत होत्या. ‘डेंजर डीसीपी’ म्हणून ओळख असलेल्या उपायुक्‍तांच्या हद्दीत गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संभाजी कदम यांनी छापा घातला. या छाप्यानंतर अजनी पोलिसांचे पितळ उघडे पडले.

गुन्हे शाखेने काशिनगरातील घरात सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पंटर पाठवला. त्याने भावनाशी सौदा केला आणि मनीषाने २२ वर्षीय तरुणीला देहव्यापारासाठी तयार केले. एसएसबीच्या मीना जगताप या पथकासह पाळत ठेवून होत्या. पोलिसांना इशारा मिळताच दोन्ही महिला दलालांना ताब्यात घेतले. 

तीन वर्षांपासून हर्षा आणि भावना पीडित तरुणींकडून देहव्यापार करवून घेत होत्या. पोलिसांनी तरुणीची सुटका केली आणि हर्षा आणि भावनाला अटक केली. तरुणी विवाहित असून त्यांना चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला या जिल्ह्यातसुद्धा आंबटशौकिनांसोबत देहव्यापारास पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले.

रॉयल लॉजवर छापा
नवीन कामठी परिसरातील रॉयल लॉजमध्ये अनेक महिन्यांपासून देहव्यापार सुरू होता. लॉजचे मालक जगदीश संजय मोहबे (२७), संजय रामसिंग मोहबे व धर्मपाल संजय मोहबे (तिघेही रा. रविदासनगर, येरखेडा, कामठी) हे केवळ पाचशे रुपये टीप दिल्यास आंबटशौकिनांना तरुणी पुरवीत असल्याची माहिती सहायक निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्‍के यांना मिळाली. त्यांनी गुरुवारी दुपारी सापळा रचून पंटर पाठवून खात्री केली. 

दलाल लता विजय डोलेकर (रा. कामठी) ही तरुणींना आंबटशौकिनांशी शारीरिक संबंधासाठी तयार करून जाळ्यात ओढते तर मो. साजीद शफिक पठाण (रा. कामठी) हा ऑटोने ग्राहकांपर्यंत तरुणींना पोहोचवून देत होता. दोन तरुणींशी पंटरने सौदा केला. यशोधरानगरातील रॉयल लॉजवर दोन्ही तरुणी आल्या. त्यांनी लॉजमालक मोहबे यांना इशारा केला आणि दोन्ही ग्राहकांसह आत गेल्या. पोलिसांनी छापा घातला. छाप्यात दोन ग्राहक व दोन तरुणी देहव्यापार करताना सापडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT