विदर्भ

रविशंकर शुक्‍ल यांनी केले होते ध्वजारोहण

मंगेश गोमासे
नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळाले अन सकाळीच लाल किल्ल्यावर स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी फडकविला. यासोबतच ठिकठिकाणी शासकीय कार्यालयांवर तिरंगा फडकविण्यास सुरुवात झाली. नागपुरात सीताबर्डी किल्ल्यावर पं. रविशंकर शुक्‍ल यांनी दुपारी चार वाजता तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला होता.
स्वातंत्र्यलढ्यात नागपूर अनेक घटनांनी प्रकाशझोतात आले होते. महात्मा गांधींची "असहकार' चळवळ असो वा "चले जाव'चा नारा यासाठी नागपूरची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. हजारो स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी दिलेल्या लढ्यातून अखेर ब्रिटिशांनी देशाला स्वातंत्र्य द्यायचे ठरविले अन्‌ तो दिवस उगवला ज्या दिवसाची प्रत्येकच भारतीयाला वाट होती. 15 ऑगस्ट 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. यावेळी इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या सीताबर्डी किल्ल्यावर तिरंगा फडकवायच्या उद्देशाने परिसरात मोठी गर्दी जमली होती. यावेळी पं. रविशंकर शुक्‍ल आणि सेंट्रल प्रोव्हिडन्स ऍन्ड बेरारचे नवनियुक्त राज्यपाल मंगलदासजी पक्वासा दुपारी चार वाजता सीताबर्डी किल्ल्यावर पोहचले. विशेष म्हणजे पंडितजींसोबत चौथै राजे रघुजी भोसले यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत हजारोंच्या साक्षीने पं. रविशंकर शुक्‍ल यांनी तिरंगा फडकवीत, नागपुरात स्वातत्र्यांचा उत्सव साजरा केला. यावेळी "भारतमाता की जय' म्हणून त्यांनी जनतेचे अभिवादन केले. यानंतर 1950 साली मध्यप्रदेशाची निर्मिती झाल्यावर पं. रविशंकर शुक्‍ल हे पहिले मुख्यमंत्री झाले.
कुंजीलाल दुबेंनी विद्यापीठात केले ध्वजारोहण
पं. कुंजीलाल दुबे यांनी 16 जानेवारी 1947 साली नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून न्या. डब्ल्यू. आर. पुराणिक यांच्याकडून पदभार स्वीकारला. 1956 पर्यंत ते म्हणजे विद्यापीठाच्या इतिहासात सर्वाधिक काळ कुलगुरू राहिल्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. केवळ हाच सन्मान नव्हे तर विद्यापीठात सर्वप्रथम तिरंगा फडकविण्याचा मान त्यांना मिळाला आहे हे विशेष. यानंतर ते लगेच मध्य प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्षही झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT