file photo
file photo 
विदर्भ

"त्या' डॉक्‍टरविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

सकाळ वृत्तसेवा

अमरावती ः शुभम सुरेशराव डोंगरे (वय 22) याचा मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. विजय बनसोडे यांच्या हलगर्जीपणामुळेच झाला, असे सांगत त्यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी (ता. एक) निवेदनाद्वारे करण्यात आली.
शुभम हा वलगावला जाताना मार्गात त्याचा अपघात झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉ. बनसोडे यांच्याशिवाय अपघात कक्षात परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यापैकी कुणीच नव्हते. सुरक्षारक्षकाने शुभमचे ड्रेसिंग केले. शुभमवर तातडीने उपचार करा, अशी विनंती नातेवाइकांनी वारंवार केली, मात्र डॉक्‍टर तब्बल दीड तास भ्रमणध्वनीवर होते. शुभमने जखमांबाबतची संपूर्ण माहिती दिली. तेव्हा त्याच्या डोक्‍याला दुखापत नव्हती. डॉक्‍टरांनी त्याला सिटीस्कॅनसाठी पाठविले व सिटीस्कॅनमधून बाहेर आणताच मृत घोषित केले. नातेवाइकांनी 28 जूनला पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शुभमच्या मृतदेहाची बारकाईने पाहणी केली, तेव्हा त्याच्या डोक्‍याला तीन इंच जखम होती, असे सांगत निष्क्रियता लपविण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. संबंधित डॉक्‍टरची नोंदणी रद्द करावी, त्यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, मृताच्या नातेवाइकांना 25 लाखांची मदत शासनातर्फे देण्यात यावी, अशीही मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे, रायुकॉंचे प्रदेश सरचिटणीस निखिल ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष धीरज निंभोरकर, राविकॉंचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल ठाकरे, शहराध्यक्ष आकाश हिवसे, मेघश्‍याम करडे यांच्यासह शुभमच्या नातेवाइकांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतला कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

T20 World Cup 2024 All Teams Squad : भारत, पाकिस्तान, इंग्लंडसह सर्व 20 संघांचा 'स्क्वाड'! जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

SCROLL FOR NEXT