images (1).jpg
images (1).jpg 
विदर्भ

अश्लील चाळ्यासाठी दोन हजार रुपये तासाने मिळायची रुम

सकाळ वृत्तसेवा

अकोला :  रेल्वे स्टेशनसमोरील हॉटेल ब्ल्यू डायमंड आणि रसोई फॅमिली रेस्टॉरंट या दोन्ही हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविण्यात येत असतांना पोलिसांनी छापेमारी करून पर्दाफाश केला. त्यानंतर या दोन्ही हॉटेलचे अनेक भयंकर प्रताप समोर येत असून, शहरासह ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना दोन हजार रुपये तासाप्रमाणे या ठिकाणी रुम उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉटेल मालकाच्या संमतीने हा प्रकार सुरू होता. याप्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा तपास पोलिस करीत आहेत.


ब्ल्यू डायमंड हॉटेलचा भाडेकरू प्रशांत जावरकर, सनी नवले हे दोघे जन हॉटेल ब्ल्यू डायमंडसह रसोई फॅमिली रेस्टॉरंट येथे तरुण-तरुणींना खास सुवीधा असलेल्या रुम दोन हजार रुपये तासाप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगीतले. हे दोघे जण या दोन्ही हॉटेलमध्ये ग्राहकांच्या माध्यमातून देहविक्रय अड्डा चालवित असतांना स्थानिक गुन्हे शाखेने शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही हॉटेलवर सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर छापा टाकला होता. तरुण तरुणी पळून जाण्यात यशस्वी झाल्या. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणावरून ब्ल्यू डायमंड हॉटेलचा चालक सनी नवले व भाडेकरू प्रशांत जावरकर यांच्याविरुद्ध रामदासपेठ पोलिस ठाण्यात पीटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. मात्र सदर अड्डा चालविण्यासाठी रुमच्या सुविधांसह पोलिसांनाही मॅनेज करण्याची भाषा बोलणाऱ्या हॉटेल रसोईचा मुख्य सुत्रधार अद्यापही मोकाट असल्याचे वास्तव आहे.

देहव्यापाराचे पाळेमुळे खोदण्याची गरज
शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या देहव्यापाऱ्याच्या दहा ते 11 अड्डयांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली आहे. मात्र या प्रकरणातील खरे सुत्रधार अद्यापही मोकाट असल्याचे वास्तव आहे. यामध्ये हॉटेल रसोई तसेच ब्ल्यू डायमंड या दोन ठिकाणी तर तरुणींसह लहान मुलींनाही खोली देण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी हा व्यवसाय चालविणाऱ्या तसेच पैशाच्या बळावर प्रत्येकाला दाबणाऱ्या मुख्य सुत्रधाराचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

येवता येथील महिलांना समजपत्र
येवता येथील देहव्यापार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती होती. मात्र दोन्ही महिलांना पोलिसांनी समजपत्र देउन सोडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे येवता येथे यापूर्वीही कारवाई केल्यानंतरही हा अड्डा सुरुच असल्याचे वास्तव आहे. याकडे पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनीही लक्ष घातल्यास मोठे रॅकेटच बाहेर येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT