RSS
RSS 
विदर्भ

स्वयंसेवकांच्या लाठीवरून सरसंघचालकांना नोटीस

सकाळवृत्तसेवा

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये बाळगली जाणारी लाठी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा करणारी याचिका नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीनंतर आज (गुरुवार) न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

लाठीचे प्रदर्शन करू नये किंवा बाळगू नये, तसे झाल्यास नियमांचे उल्लंघन म्हणून संबंधितांवर कारवाई केली जाईल, या अटींवर पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला परवानगी दिली होती. परंतु, सरसंघचालक मोहन भागवत आणि व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे यांनी स्वयंसेवकांना पथसंचलनात लाठी घेऊन सहभागी होण्याच्या सूचना दिल्या. ही बाब पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा याचिकाकर्ता मोहनीश जबलपुरे यांनी केला आहे.

याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात माहितीच्या अधिकारात पोलिसांकडूनही माहिती प्राप्त केली होती. सुरुवातीला याचिकाकर्त्यांनी कोतवाली पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली. पुराव्यादाखल छायाचित्रेही जोडली होती. मात्र, पोलिसांनी याचिकाकर्त्यांची दखल घेतली नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील संबंधित पदाधिकाऱ्यांची चौकशीही केली नाही, असे याचिकेत नमूद आहे. त्यामुळे जबलपुरे यांनी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली. कनिष्ठ न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी याचिका दाखल करून दाद मागितली. जबलपुरे यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि संघाचे व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे यांच्यासह कोतवाली पोलिसांनाही प्रतिवादी केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवकांच्या हातात असलेल्या लाठीवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी केली आहे. या प्रकरणात सरसंघचालक व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. येत्या ११ डिसेंबरला पुढील सुनावणी निश्‍चित करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT