admission
admission 
विदर्भ

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

विवेक मेतकर

अकोला : महानगरांमधील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी विज्ञान प्रवेशसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय प्रवेश समितीकडून पहिल्या दिवशी 1100 माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. परंतु 55 कॉलेज व 5860 जगांचा पर्याय उपलब्ध असताना प्रवेश अर्ज भरताना केवळ विकास महाविद्यालयाचा पर्याय निवडणार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू शकतो.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा अर्ज कम्प्युटर सेंटरवर भरण्यासाठी विद्यार्थी किंवा त्याचा पालक उपस्थित असणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्वीकारू नये, दहावी उत्तीर्ण खंड असलेल्या विद्यार्थ्यांची बेस्ट फाइव ची टक्केवारी अर्जात नमूद करावी, अर्जात विद्यार्थ्यांना 55 महाविद्यालयांच्या पर्याय उपलब्ध आहे. एकच पर्याय दिल्यास प्रवेशात अडचणी निर्माण होऊ शकतात. एकाच विद्यार्थ्याकडून एकापेक्षा जास्त अर्ज स्वीकारण्यात येऊ नये. अशा प्रकारच्या सूचना संगणकीय स्वीकृती केंद्र संचालकाला देण्याचा निर्णय केंद्रीय प्रवेश समिती कडून घेण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद आगरकर महाविद्यालय स्टेशन रोड येथे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जाच्या वितरणाचा प्रारंभ समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT