File photo
File photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 :विधानसभा मतदारसंघात "सखी मतदान केंद्र'

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधानसभा निवडणुकांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात "महिला व्यवस्थापित मतदान केंद्र' निर्माण करण्यात येईल. शहर व जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्र राहणार आहे. या केंद्रांमध्ये पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी महिला असतील.
लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून महिलांनी चालवलेले महिला मतदान केंद्र असणार असून, याला "सखी मतदान केंद्र' म्हटले जाणार आहे. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. नागपुरात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. यात दक्षिण-पश्‍चिम, दक्षिण, पूर्व, पश्‍चिम, उत्तर व मध्य याचा समावेश आहे. या सहाही विधानसभा मतदारसंघात स्त्री मतदारांची संख्या 10 लाख 47 हजारांवर आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कामठी, उमरेड, काटोल, हिंगणा, रामटेक व सावनेर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. येथे महिला मतदारांची संख्या 9 लाख 13 हजारांवर आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सखी मतदान केंद्र राहणार आहे. "सखी मतदान केंद्र' अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह साफसफाईवर विशेष भर देण्यात येईल. प्रत्येक मतदारसंघातून एकाच मतदान केंद्राची निवड होईल. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे.
महिलांचा सहभाग वाढणार
यंदाच्या निवडणुकीत महिला शक्ती निर्णायक ठरणार आहे. "सखी मतदार केंद्र' स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT