समीर मेघे  
विदर्भ

समीर मेघे म्हणाले, राष्ट्रवादीच्या शंभर कार्यकर्त्यांचे फोन आले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून मला राष्ट्रवादीच्या शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचे फोन आले. ते उमेदवार असतील तर आम्ही उद्याच पक्ष सोडण्यास तयार असल्याचे सांगितल्याचा दावा हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी केला. यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यासोबत नाही हे दिसून येते असेही मेघे म्हणाले.
समीर मेघे यांच्या राजकारणामुळे आपण भाजप सोडत असल्याचा आरोप करून घोडमारे राष्ट्रवादीत दाखल झाले. याबाबत विचारणा केली असता मेघे यांनी कोणते राजकारण केले हे मला ठाऊक नाही, त्यांना पक्ष सोडण्यासाठी कदाचित काहीतरी बहाणा हवा होता, असे सांगितले. तीन वर्षांपासून घोडमारे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री बंग यांच्यासोबत मिळून भाजपविरोधात कामे कामे करीत होते. प्रत्येक स्थानिक निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विरोधातच काम केले. रमेश बंग यांना पराभूत करूनच ते आमदार झाले. त्यासाठी हिंगण्यातील सर्वांनीच त्यांना सहकार्य केले होते. आता तेच बंग यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. याचा फटका भाजपऐवजी त्यांनाच जास्त बसणार आहे. आशा करतो घोडमारे यांनाच उमेदवारी मिळावी आणि आपल्या विरोधात निवडणूक लढवावी. मी त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या तुलनेत माझ्या काळात कित्येक पटीने विकासकामे मतदारसंघात झाली आहेत. त्यांचे गाव असलेल्या क्षेत्रातच 30 ते 32 कोटींची कामे केली आहेत. या बाबतीत मी त्यांच्यासोबत कुठल्याही मंचावर चर्चा करण्यास तयार आहो. हिंगण्यातील लोक हुशार आणि जागरूक आहे. ते नक्कीच विकासासोबत जातील, याचा विश्‍वास असल्याचे आमदार मेघेंनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा नवा आयुक्त कोण होणार? ४ IAS अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा; राजकीय-प्रशासकीय हालचाली वाढल्या

पुण्यात अवकाळी पावसाने रस्त्यावर साचलं पाणी, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; रस्ते जलमय

Beautiful People : भारताच्या 'या' टोकावर राहते अशी जमात जिथे लोक जगतात १०० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य, सत्तरीनंतरही बायका दिसतात तरुण

PNB Scam: माजी लिपिकाचा दोषमुक्तीसाठी अर्ज, पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT