चातगाव : येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सृष्टी संस्थेचे पदाधिकारी.
चातगाव : येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सृष्टी संस्थेचे पदाधिकारी.  
विदर्भ

दुर्गम गावांत घेतला ग्रामीण भारताचा शोध

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : ग्रामीण भारतात नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या धेयवेड्या लोकांना शोधून त्यांच्या कार्याचा सन्मान करून सेंद्रिय शेतीबाबत जनजागृतीत तसेच लघु व्यवसाय निर्माण करण्याच्या हेतूने ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. गुजरातमधील सृष्टी या संस्थेअंतर्गत यंदा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्‍यातील आदिवासीबहुल ग्रामीण भागात 20 गावांमध्ये शोधयात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून हजारो लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
या उपक्रमात 55 शोधयात्री सहभागी झाले होते. चातगाव परिसरातील 20 गावांमध्ये जवळपास 85 किमी पायी फिरून ग्रामीण भारताचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्च या सेवाभावी संस्थेच्या "निर्माण' उपक्रमाशी जुळलेले 10 युवा शोधयात्रेत सहभागी झाले होते. गावाच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या तळागाळातील स्थानिक लोकांना शोधून त्यांचा सत्कार करण्याचे कार्य सृष्टी या संस्थेद्वारे अनेक वर्षांपासून केले जात आहे. जिल्ह्यात विविध कार्यांत सहभागी35 व्यक्तींचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. शोधयात्रेदरम्यान रोजगार, ग्रामीण विकास याबाबतही गावातील लोकांना मार्गदर्शन करण्यात आले. वर्षातून दोन वेळा ही शोधयात्रा आयोजित केली जाते. या वर्षी 13 ते 18 जून या दरम्यान 44 वी शोधयात्रा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्‍यातील 20 गावांमध्ये निर्माण आणि सर्चच्या मदतीने काढण्यात आली.
गावागावांत साधला संवाद
गडचिरोली जिल्ह्यात साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने येथील लोकांना वैकल्पिक जीवन जगण्याची संधी आहे. मात्र, याला जोड जैविक शेती, वनांवर आधारित उद्योग, बांबू, तेंदूपत्ता, चारोळी, अर्जुन वृक्ष, जांभूळ, हिरडा, बेहडा, आवळा, मध संकलन यातून बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळू शकते. मात्र, उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने फारसा फायदा होत नाही. सृष्टी संस्थेने शोधयात्रेच्या माध्यमातून लोकांच्या गरजा जाणून घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT