File photo
File photo 
विदर्भ

मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची कामे जून-जुलैपासून

सकाळवृत्तसेवा

नागपूर : दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोच्या विस्तृत आराखड्याला राज्य सरकारच्या मान्यतेनंतर केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. केंद्र सरकारकडून जून-जुलैपर्यंत या आराखड्याला मंजुरी मिळणार असून, त्यानंतर लगेच कामे सुरू करण्यात येतील, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी मंगळवारी सांगितले. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या 11 कोटी 216 रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.
उपनगरीय रेल्वेच्या धर्तीवर नागपुरात मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. मेट्रोने तयार केलेल्या 11 हजार 216 कोटींच्या 48.3 किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोच्या विस्तृत आराखड्याला सरकारने मंजुरी दिली. आता केंद्राच्या गृहनिर्माण आणि नगरविकास विभागासह इतर विभागांच्या मंजुरीनंतर विस्तारित प्रकल्पाचे काम मार्गी लागेल, असे डॉ. दीक्षित यांनी नमूद केले. पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे काम 75 टक्के पूर्ण झाले. हे काम पूर्ण होण्यापूर्वी विस्तारित मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होईल, असेही ते म्हणाले. दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचा विस्तार ऑटोमोटिव्ह चौक- कन्हान, मिहान-बुटीबोरी एमआयडीसी ईएसआर, प्रजापतीनगर-ट्रान्सपोर्टनगर, लोकमान्यनगर-हिंगणा, वासुदेवनगर-दत्तवाडीपर्यंत राहणार आहे. नागपूर मेट्रोत कन्हान ते बुटीबोरी हा सर्वाधिक 52 किमी लांबीचा मेट्रोमार्ग राहणार असून, लोकमान्यनगर ते हिंगणा हा मार्ग 31 किमी लांबीचा होईल. पत्रकार परिषदेला नागपूर मेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाडे, सुनील माथूर आदी उपस्थित होते.
ब्रॉडगेजचा प्रस्ताव सरकारच्या कोर्टात
रेल्वे ट्रॅकवर मेट्रो चालविण्याच्या (ब्रॉडगेज मेट्रो) प्रकल्पाचा 300 कोटींच्या सविस्तर आराखड्यासह फिजिब्लिटी रिपोर्ट मेट्रोने तयार केला. मंजुरीसाठी सध्या राज्य सरकारच्या कोर्टात आहे. त्यावर अभ्यास सुरू असल्याची माहिती महामेट्रोचे डॉ. दीक्षित यांनी दिली.
एमआयडीसी, एमएडीसी देणार निधी
प्रकल्प खर्चाच्या 20 टक्के हिस्सा समभाग म्हणून आणि केंद्रीय कर यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत निधी देण्यात येणार आहे. केंद्रीय करातील हिस्सा आणि राज्य करासाठी राज्य शासन (2080 कोटी), एमआयडीसी (561 कोटी), व एमएडीसी (561 कोटी) निधी देणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT