file photo
file photo 
विदर्भ

सात हजार कुटुंबीयांचा जीव धोक्‍यात 

सकाळ वृत्तसेवा

नवेगावबांध(गोंदिया) : येथील जलाशयात गाळ साचला असून, बुडीत क्षेत्रातील जागेवर अवैधरित्या अतिक्रमण करण्यात आले. तेथील शेतात शेतकरी पीक लागवड करतात. पिकांवर रासायनिक खते, कीटकनाशक औषधी फवारणी करतात. त्यामुळे जलाशयातील पाणी दूषित, विषारीयुक्‍त झाले असून, नवेगावबांध ग्रामपंचायत, सिरेगाव, पिंपळगाव येथील पाणीपुरवठा योजनाद्वारे 28 गावांना पाणीपुरवठा केला जातो. यामुळे 7 हजार कुटुंबीयांसह पशुपक्ष्यांचाही जीव धोक्‍यात आला आहे. दरम्यान, त्वरित येथील अतिक्रमण हटवून स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत. 
450 वर्षांपूर्वी नवेगावबांध येथील कोलू ऊर्फ कवळू पाटील डोंगरवार यांनी सिंचनाकरिता सात पर्वतांच्या मधल्या भागात जलाशयाचे खोदकाम सुरू केले. तेथील अपूर्ण खोदकाम त्यांचे पुत्र नवेगावबांधचे मालगुजार सीताराम पाटील डोंगरवार यांनी पूर्ण केले. तेव्हा गट क्रमांक 1292 मध्ये 5698 हेक्‍टर आर पाणलोट क्षेत्रात 1000.34 हेक्‍टर आर बुडीत क्षेत्र आहे. त्यापैकी 824 हेक्‍टर आर. जमीन सद्यस्थितीत उपलब्ध आहे. उर्वरित 200 हेक्‍टर आर तलावक्षेत्रातील जमीनीवर रामपुरी, जांभळी, येलोडी, पवनी, धाबे, टेकडी, रांजीटोला व कोहळीटोला या गावांतील काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करीत शेतजमिनी काढल्या. तेथील शेतात शेतकरी पीक लावतात. पिकांवर रासायनिक खते, कीटकनाशक औषधी फवारणी करतात. त्यामुळे येथील पाणी दूषित आणि विषयुक्‍त झाला आहे. गेल्या 450 वर्षांचा विचार केल्यास तेथील गाळ व खोलीकरणाची कामे पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली नाही. हा प्रकार कुणालाच ठाऊक नसल्याने याची वाच्यतासुद्धा होत नाही. अशी माहिती स्थानिक पक्षिप्रेमींनी दिली आहे. 
विशेष म्हणजे, या जलाशय लगत नवेगाव-नागझिरा अभयारण्य आहे. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात वावरताना दिसतात. तेथील पाणी पितात. सद्यःस्थितीत पाणीपुरवठा जास्त आहे. यामुळे विषारी अंश कमी जाणवत आहेत. तथापि, बुडीत क्षेत्रात वाढत जाणारा अतिक्रमण, स्थलांतरीत पक्ष्यांची दरवर्षी घटत जाणारी संख्या, तलावातील जैवविविधतेचा होणारा धोका, सिंचन, व पिण्यासाठी पाण्याची दरवर्षी होणारी तीव्रटंचाई हे, संभाव्य धोके लक्षात घेता हे, जलाशय पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित आहेत. शासनस्तरावर तलावांचे संरक्षण व उपाययोजना करण्याची गरज आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. येथील जमीन सातबारावरून सर्वेक्षण करून त्वरित अतिक्रमण हटविण्यात यावे व नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नवेबावबांध फाउंडेशनने केली आहे. 

गेल्या पाच वर्षांनंतर यंदा तलाव तुडुंब भरले आहे. पाटबंधारे व महसूल विभागाने जलाशय जमिनीच्या सातबारावरून अतिक्रमण निश्‍चित करून योग्य कारवाई करावी, तसेच बुडीत क्षेत्रातील सीमा निश्‍चित करून सिमेंटचे खांब गाडून अतिक्रमणाच्या विळख्यातून सोडवावे. ही पाटबंधारे व महसूल विभागाची जबाबदारी आहे. येथील विषयुक्‍त पाण्यामुळे नागरिक, पशुपक्ष्यांचे जीव धोक्‍यात आले आहे. 
रामदास बोरकर, सचिव नवेगावबांध फाउंडेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT