विदर्भ

स्कूलबस कंडक्‍टरचा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

अनिल कांबळे

नागपूर- चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून स्कूलबसच्या कंडक्‍टरने चार वर्षीय चिमुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी चिमुकलीच्या आईच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी कंडक्‍टरवर गुन्हा दाखल केला. आकाश अरूण माचूरकर (वय 26, रा. कामना नगर,कळमना) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली. 

आरोपी आकाश माचूरकर हा कळमन्यातील एका नामांकित शाळेत स्कूलबसवर कंडक्‍टर म्हणून सात महिन्यांपूर्वी नोकरीला लागला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वागण्यावर अनेकांनी आक्षेप नोंदविला होता. मात्र, शाळाप्रशासनाने त्याच्याविरूद्ध कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे त्याची हिम्मत वाढली.

गुरूवारी दुपारी एक वाजता तो शाळेतून स्कूलबस घेऊन मुलांना सोडत होता. स्कूलबसमध्ये जवळपास 35 ते 40 मुले-मुली होत्या. कळमन्यात राहणारी चार वर्षीय चिमुकलीजवळ तो मधल्या सीटवर बसला. त्याने चॉकलेट देऊन तिच्याशी लैंगिक चाळे केले. कुणालाही सांगू नये म्हणून बसमधून फेकून देण्याची धमकी दिली.

मुलीला घराजवळ उतरवून दिल्यानंतर तो निघून गेला. ही घटना आईला सांगितल्यानंतर उघडकीस आल्यानंतर कळमना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी आरोपी बस कंडक्‍टर आकाश माचूरकरला अटक केली. 

असा आला प्रकार उघडकीस 
मुलगी घरी आल्यानंतर तिने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. सायंकाळी मुलीला डॉक्‍टरकडे नेल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. डॉक्‍टरांनी त्वरित उपचार करून पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला.

पालकांनो सावधान...! 
अनेक पालक बस चालक-वाहकांच्या हवाली करून मोकळे होतात. अनेकदा मुले-मुली चालक किंवा वाहकांच्या तसेच अनेकदा शिक्षकांच्याही तक्रारी करतात. परंतु पालक तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे चालक-वाहकांची हिम्मत वाढते. पालकांचा मुलांशी संवाद होत नाही. आईसुद्धा मुलांकडे आस्थेने विचारपूस करीत नाही. त्यामुळे अशा अघटित घटना मुलांसोबत घडतात. असे प्रकार रोकण्यासाठी पालकांनी सावधानता बाळगायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT