Crime
Crime sakal
विदर्भ

Shegaon Crime : गर्भवती महिलेवर चुकीचा उपचार; दोन डॉक्‍टरवर गुन्‍हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

शेगाव - गर्भवती महिलेवर चुकीचा उपचार केल्याप्रकरणी शेगाव पोलीस स्‍टेशनमध्ये डॉ. प्रविण नागरगोजे व खामगाव येथील डॉ. गणेश महाले यांच्या विरुध्द शेगाव पोलिसांनी २३ मे रोजी विविध कलमान्वये न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल केला.

शितल निलेश ढोले (२५) यांचे तर्फे अॅड. निलेश रामदास ढोले रा. द्वारा राज राजेश्वर कॉलनी शेगाव यांनी तक्रार दिली की, शितल गर्भवती असताना तिने शेगाव येथील डॉ. प्रविण नागरगोजे (वय ४२) रा. खामगाव रोड जगदंबा चौक शेगाव यांच्याकडे उपचार घेतला व त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार खामगाव येथील डॉ. गणेश महाले यांच्याकडे केला. असे असताना २९ जुलै २०२२ रोजी शितल ढोले यांनी डॉ. प्रविण नागरगोजे यांचेकडे एका मुलीला जन्म दिला.

त्यानंतर त्या मुलीचा अकोला व मुंबई येथील बालरोगतज्ञांकडे उपचार केला असता तेथील डॉक्टरांनी तिची हार्टसर्जरी व गर्भवतीवर इतर उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यावरुन डॉ. प्रविण नागरगोजे व डॉ. गणेश महाले यांनी सदर महिला गर्भवती असताना त्यांचा चुकीचा उपचार केल्यामुळे त्या महिलेला ७ ते ८ लाख रुपये खर्च सोसावा लागला असून, भविष्यात सुध्दा खर्च लागणार असल्याचे सांगितले.

याबाबत शितल ढोले यांनी यांनी साक्षीदार डॉ. अतुल राजपतू यांच्याकडे उपचार केला असता डॉ. नागरगोजे व गणेश महाले या दोघांनी त्या महिलेच्या उपचाराची गंभीरतेने दखल घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्याने ॲड. निलेश ढोले यांच्याद्वारे विद्यमान न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीहून २३ मे रोजी न्यायालयाच्या आदेशाने उपरोक्त दोन्‍ही डॉक्टरांविरुध्द शेगाव पोलीस स्‍टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT