Shegaon municipal commissioner and Accountant Captured while taking Bribe
Shegaon municipal commissioner and Accountant Captured while taking Bribe 
विदर्भ

शेगाव पालिकेचे मुख्याधिकारी व रोखपालास लाच घेताना ताब्यात

सकाळवृत्तसेवा

शेगाव: येथील निवासी असलेल्या प्लॉटची वाणिज्यविषयक नोंद करण्यासाठी लाच घेताना शेगाव नगरपालिका मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल आर. पी. इंगळे या दोघांनाही पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (शनिवार) सकाळी नऊ वाजता केली. या कारवाईमुळे शेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

शहरातील एका निवासी प्लॉटची वाणिज्यविषयक नोंद करण्यासाठी दस्तवेज पालिकेत सादर करण्यात आले. दरम्यान, या प्लॉटची वाणिज्यविषयक नोंद करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी रोखपालाच्या मध्यस्थीने केली. सदर प्रकरणी संबधितांनी यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

लाच मगितल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन ठिकाणी विभागून एकाचवेळी शेगाव पालिकेचे अतुल पंत व मुख्याधिकारी रोखपाल आर. पी. इंगळे या दोघांच्या घरी धाड टाकली. मुख्याधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून एक लाख 20 हजारांची रक्कम स्वीकारताना रोखपाल आर.पी. इंगळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी दुसऱ्या पथकाने मुख्याधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले.

निवासी प्लॉटची वाणिज्यविषयक नोंद करण्यासाठी सुरवातीला पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, शेवटी एक लाख 20 हजार रुपयांवर तडजोड ठरली होती. याप्रकरणी मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल आर. पी. इंगळे यांची कसून चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक करीत आहे. सदर घटनेची बातमी सोशल मीडियावर झपाट्याने पसरली असून, यामुळे शेगाव पालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT