संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

दुरांतोसह सहा रेल्वेगाड्या रद्द

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि दिल्ली मार्गावरील कामांचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. शुक्रवारी मुंबईहून रवाना होणारी मुंबई - नागपूर दुरांतो रद्द करण्यात आली आहे. दुरांतोसह एकूण 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोबतच 4 गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावत आहेत. यामुळे प्रवाशांना मात्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर पाणीच पाणी दिसून आले. अजनीतील सिंक लाईनही पाण्याखाली गेल्याचे चित्र होते.
12261 मुंबई - हावडा दुरंतो निर्धारित वेळेपेक्षा 8 तास उशिरा धावत होतीा. 16863 भगत की कोठी- मन्नारगुढी एक्‍स्प्रेस - 7 तास, 12139 मुंबई - नागपूर सेवाग्राम एक्‍स्प्रेस - 2 तास आणि 18029 एलटीटी - शालीमार एक्‍स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा 3.30 तास उशिरा धावत होत्या. दिल्ली मार्गावर कामांमुळे 12269 चेन्नई - हजरत निजामुद्दीन दुरंतो एक्‍स्प्रेस, 12644 हजरत निजामुद्दीन -त्रिवेंद्रम सुवर्ण जयंती एक्‍स्प्रेस, 22415 विशाखापट्टनम नवी दिल्ली एक्‍स्प्रेस, 12808 निजामुद्दीन - विशाखापट्टनम समता एक्‍स्प्रेस आणि 12410 निजामुद्दीन - रायगढ गोंडवाना एक्‍स्प्रेस आज रद्द करण्यात आल्या. परिणामी नागपूर रेल्वे स्थानकावर गाड्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. रेल्वे प्रशासनाने गाड्या रद्द आणि उशिरा येणाऱ्या गाड्यांचे मॅसेज पाठविले. मात्र, काही प्रवासी स्टेशनवर पोहोचल्याने फलाटावर चांगलीच गर्दी पाहायला मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT