कुही ः कत्तल केलेली झाडे विकल्यानंतर उरलेले सरपण.
कुही ः कत्तल केलेली झाडे विकल्यानंतर उरलेले सरपण.  
विदर्भ

ग्रामपंचायतीनेच केली झाडांची कत्तल 

सकाळ वृत्तसेवा

कुही/पचखेडी  (जि.नागपूर)  ः तालुक्‍यातील गोसेखुर्द प्रकल्पबाधित मालोदा येथील शासकीय जमीनीवरील शेकडो झाडे ग्रामपंचायत आंभोरा (खुर्द)येथील उपसरपंच व सचिवांनी शासनाची परवानगी न घेता कापली व लिलाव करून विकली, अशी तक्रार मालोदा येथील कामेश्वर वासुदेव देशमुख यांच्यासह 57 गावकऱ्यांनी आयुक्‍तांकडे केली आहे. 

तक्रारीत नमूद केल्यानुसार कुही तालुक्‍यातील गोसेखुर्द प्रकल्पबाधित मालोदा येथे 1985 च्या सुमारास तत्कालीन गटग्रामपंचायत गोन्हा यांच्यावतीने शासकीय निधीतून हजारो रुपये खर्चुन वृक्षारोपण केले. त्यामध्ये आंबा, नीलगिरी, सुबाभूळ, कडुलिंब, सीताफळ, सागवन इत्यादी प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात आले होते. कालांतराने मालोदा हे गाव गोसेखुर्द प्रकल्पबाधित झाले. त्यानंतर मालोदा हे गाव आंभोरा(खुर्द)गटग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आले 
शासनाने हजारो रुपये खर्च करून लावलेली झाडे मे 2019 मध्ये आंभोरा खुर्द येथील उपसरपंच राजू कुकडे व सचिव विजय बारमासे यांनी शासनाची कुठलीही परवानगी न घेता तसेच ग्रामपंचायतीचा कुठलाही ठराव न करता खासगी कंत्राटदारामार्फत तोडली व परस्पर विकली. झाडांची लाखो रुपयांची किंमत असताना तोडलेल्या झाडांचा प्रकरणाचा बोभाटा होऊ नये म्हणून सामान्य फंडात बारा हजार रुपये जमा केले. 

एकीकडे राज्य शासन वनक्षेत्र वाढावे म्हणून सात कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवित आहे, तर दुसरीकडे जबाबदार लोकप्रतिनिधी व लोकसेवक शासनाची परवानगी न घेता लक्षावधी रुपयांची झाडे तोडून शासकीय मालमत्तेचा अपहार करीत आहेत. या बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणाची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, सीईओ, विदर्भ पाटबंधारे विभाग, अधीक्षक अभियंता गोसेखुर्द, कार्यकारी अभियंता पुनर्वसन. उपविभागीय अधिकारी 

नोहेंबर महिन्यात जर तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, तर एक डिसेंबर 2019पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत. 
कामेश्वर वासुदेव देशमुख 
मालोदा 

बेकायदेशीरपणे केलेल्या वृक्षतोड प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करावी. 
सुधीर बेले 
पर्यावरणप्रेमी, वेलतूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT