छायाचित्र
छायाचित्र 
विदर्भ

बसप नेत्यांचे पुतळे जाळले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः कधीकाळी महाराष्ट्रात प्रभावी असलेला बसप आता राज्यात शक्तिहीन होत आहे. पक्षाची ही अवस्था नेत्यांमुळे झाली आहे. 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा कमी मतदान या वेळी झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी टेकानाका परिसरात प्रदेशाध्यक्ष ऍड. संदीप ताजने आणि प्रभारी व राज्यसभेचे खासदार ऍड. वीरसिंग या नेत्यांचे मंगळवारी (ता. 5) पुतळे जाळले.
पूर्वी पक्षनेत्या मायावती यांनी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला जात होता. कॅडरबेस व शिस्तीत असलेल्या कार्यकर्त्यांच्या डोक्‍यावर बेशिस्त नेते लादण्यात येत आहेत. यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. यामुळेच उपराजधानीत मंगळवारी टेकानाका परिसरात कार्यकर्त्यांचा भडका उडाला आणि नेत्यांचे पुतळे जाळण्यात आले. या दोन्ही नेत्यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.
बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांचा शब्द अखेरचा असतो. त्यांनीच महाराष्ट्रातील निवडणुका संपल्यानंतर ऍड. संदीप ताजने यांची प्रदेशाध्यक्षपदी व खासदार ऍड. वीरसिंग यांची परत प्रदेश प्रभारीपदी नेमणूक केली. मात्र, मतमोजणी सुरू असताना निवडणुकीतील उमेदवार सुरेश साखरे यांना पक्षातून निलंबित केले. यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. मायावती यांच्याकडे चुकीचा अहवाल पाठविण्यात येत असल्यामुळेच प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे. मंगळवारी नेत्यांच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनात जिल्हा प्रभारी उषा बौद्ध, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गजभिये, उत्तर नागपूर अध्यक्ष राजेश नंदेश्‍वर, नगरसेवक इब्राहीम टेलर, तपेश पाटील, उमेश मेश्राम, चंद्रशेखर भंडारे, दीपक खंडारे, विजय कैकाडे, आशीष सोमकुंवर, बळवंत राऊत, अक्षय जांभूळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आठवण एका प्रसंगाची
प्रदेशाध्यक्ष ऍड. ताजने यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी अमरावती येथे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. याच नेत्याला पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदावर आरूढ करणे हे योग्य नव्हे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. आता जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त करीत आहेत. प्रभारी ऍड. वीरसिंह आणखी किती वर्षे महाराष्ट्राचे प्रभारी राहतील? त्यांनी पक्ष बळकट करण्याऐवजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावली, असा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT